फोटो सौजन्य: Social Media
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कार्सचे वारे जोरदार वेगाने वाहत आहे. आज प्रत्येक ऑटो कंपनी देशात इलेक्ट्रिक वाहनं लाँच करत आहे. ग्राहक देखील या नव्या इलेक्ट्रिक वाहनांना उत्तम प्रतिसाद देत आहे. आता लवकरच देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी, लवकरच आपली पहिली वाहिली इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये आणणार आहे.
भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकीच्या कार्सचे वेगळेच वर्चस्व आहे. गेल्या अनेक दशकांपासून कंपनीच्या कार्स मार्केटमध्ये राज्य करत आहेत. आता विशेष म्हणजे कंपनी त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे, जी नुकतीच ऑटो एक्स्पो 2025 मध्ये सादर करण्यात आली होती.
विदेशात ‘या’ भारतीय टू-व्हीलर कंपनीचा डंका ! फक्त एका वर्षात 16 लाखांहून अधिक दुचाकींची केली विक्री
मारुती सुझुकीची ही ईव्ही कंपनीच्या Heartect ई-प्लॅटफॉर्मवर आधारित असेल आणि ती अनेक आधुनिक तंत्रज्ञान आणि सेफ्टी फीचर्सनी सुसज्ज असेल. या कारचे पॉवरफुल बॅटरी पॅक आणि लांब पल्ल्यामुळे, ते भारतीय ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय बनू शकते.
मारुती ई-विटारा दोन बॅटरी पॅक पर्यायांसह सादर केली जाणार आहे, जे 141 बीएचपीची पॉवर निर्माण करत असून, एका चार्जवर सुमारे 500 किमी रेंज प्रदान करेल. दुसरा पर्याय 171 बीएचपी पॉवरसह येणार असून, तोही 500 किमी रेंज देईल. दोन्ही बॅटरी व्हेरियंट्समध्ये 189 एनएमचा पीक टॉर्क मिळणार आहे.
ही इलेक्ट्रिक एसयूव्ही अत्याधुनिक एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स (डीआरएल) सोबत येते, ज्यामुळे तिचा लूक अधिक स्टायलिश दिसतो. समोरच्या भागात ब्लँक-ऑफ ग्रिल आहे, ज्यावर मारुतीचा आकर्षक लोगो झळकतो. ग्राहकांच्या आवडीनुसार 10 वेगवेगळ्या रंगांच्या पर्यायांमध्ये ही कार उपलब्ध असेल.
इंटिरिअरबाबत बोलायचे झाल्यास, चार ड्युअल-टोन इंटीरियर पर्याय देण्यात आले आहेत, जे केबिनला अधिक प्रीमियम लूक देतात. अधिक जागेसाठी स्प्लिट-फोल्डिंग सीट्स देखील उपलब्ध आहेत. तसेच, कारमध्ये ड्युअल स्क्रीन डिस्प्ले असून, त्यात एक नवीन ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे.
‘ही’ कार खरेदी केल्यास चक्क मिळत आहे Gold Coin, कंपनीच्या विशेष ऑफरबद्दल जाणून घ्या
ही इलेक्ट्रिक एसयूव्ही ADAS लेव्हल 2 तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, ज्यामुळे ती अधिक सुरक्षित आणि आधुनिक बनते. यात अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल असून, तो वेग आपोआप नियंत्रित करतो. लेन कीप असिस्ट तंत्रज्ञान कारला योग्य लेनमध्ये राहण्यास मदत करते. सुरक्षिततेसाठी 7 एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत, ज्या सर्व व्हेरियंटमध्ये स्टँडर्ड असतील.
मारुती ई-विटारा डेल्टा, झेटा आणि अल्फा या तीन वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये सादर केली जाईल. या इलेक्ट्रिक एसयूव्हीची अंदाजे किंमत 20 लाख ते 25 लाख रुपये (एक्स-शोरूम) असू शकते.