फोटो सौजन्य: @sergiooliveiram (X.com)
अलीकडेच निसानने ऑक्टोबर 2024 मध्ये नवीन फीचर्ससह त्यांची लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही, निसान मॅग्नाइट लाँच केली आहे. मॅग्नाइटची डिलिव्हरी सुरू होण्यापूर्वीच, त्याची बुकिंग संख्या 10,000 युनिट्स ओलांडली होती. आणि आता, कंपनी त्यावर बंपर डिस्काउंट देत आहे.
कंपनी निसान मॅग्नाइटवर तीन आकर्षक ऑफर देत आहे. निसान मॅग्नाइटवर किती डिस्काउंट उपलब्ध आहे आणि त्यात कोणते उत्तम फीचर्स दिले गेले आहेत त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5.99 लाख रुपयांपासून सुरू होते.
Maruti suzuki च्या ‘या’ कारने Tata Punch ला दिली धोबीपछाड, बनली भारतीयांची आवडती कार
या कारवर तीन मोठ्या सवलती दिल्या जात आहेत, ज्या खालीलप्रमाणे आहेत
कॅश डिस्काउंट – निसान मॅग्नाइटवर 55,000 रुपयांपर्यंत रोख सवलत दिली जात आहे.
कार्निवल ऑफर – कार्निवल बेनिफिट्सच्या स्वरूपात 10,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त ऑफर उपलब्ध आहे.
सोन्याचे नाणे – या सवलतीच्या ऑफर अंतर्गत, निसान मॅग्नाइट खरेदी केल्यावर ग्राहकांना सोन्याचे नाणे देत आहे.
परंतु, निसान मॅग्नाइटवरील कार्निव्हल बेनिफिट्स फक्त निवडक व्हेरियंटवर उपलब्ध आहेत. ही ऑफर 15 एप्रिल पर्यंत किंवा स्टॉक संपेपर्यंत वैध आहे. खरेदी करण्यापूर्वी, ग्राहकांनी त्यांच्या जवळच्या डीलरशिपकडून ऑफरबद्दल संपूर्ण माहिती मिळवणे आवश्यक आहे.
मालक असावा तर असा ! कामगारांनी टार्गेट पूर्ण केल्यामुळे मालकाने प्रत्येकाला दिली SUV कार
नवीन निसान मॅग्नाइटला एक नवीन चेहरा आणि क्रोम इन्सर्ट देण्यात आले आहेत. यात नवीन अलॉय व्हील्स, मागील बाजूस टेल लॅम्प आहेत आणि कारला नवीन लूक देण्यासाठी त्याच्या एलिमेंट्समध्ये बदल करण्यात आले आहेत.
या कारमध्ये 360-डिग्री कॅमेरा, वायरलेस फोन मिररिंग, पॉवर्ड मिरर, HEPA एअर फिल्टर, LED हेडलाइट्स आणि LED DRL सारखे प्रीमियम फीचर्स दिले गेले आहे. यात I-Key ची सुविधा देखील आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही 60 मीटर अंतरावरून कारचे इंजिन सुरू करू शकता. याशिवाय, ऑटो एलईडी लॅम्प, ऑटो डिम फ्रेमलेस आयव्हीआरएम, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, फ्रंट आर्मरेस्ट, 336-540 लिटर बूट स्पेस आणि 19+ युटिलिटी स्टोरेज सारखे फीचर्स उपलब्ध आहेत.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, निसान मॅग्नाइटमध्ये VDC, ESC, TPMS, EBS सह ABS, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, हिल स्टार्ट असिस्ट, हायड्रॉलिक ब्रेक असिस्ट, रेनफोर्ड बॉडी स्ट्रक्चर, डोअर प्रेशर सेन्सर, ग्रॅव्हिटेशनल सेन्सर, 6 एअरबॅग्ज, सीट बेल्ट रिमाइंडर आणि ISO FIX चाइल्ड सीट अँकरेज, हाय स्पीड अलर्ट सिस्टम आणि ESS (इमर्जन्सी स्टॉप सिग्नल) सारखी प्रगत सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.