फोटो सौजन्य: Social Media
हे 2024 चं वर्ष नक्कीच ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भरभराटीचे होते. या वर्षी अनेक उत्तमोत्तम कार्स लाँच झाल्यात. यातील काही इलेक्ट्रिक तर काही इंधनावर चालणाऱ्या होत्या. पण अनेक ऑटो कंपन्यांनी विक्रीच्या बाबतीत नवे उच्चांक देखील गाठले.
मारुती सुझुकी ही देशातील एक मोठी आणि विश्वासू कार उत्पादक कंपनी आहे. आजही या कंपनीची कार मार्केटमध्ये ग्राहक डोळे झाकून खरेदी करत असतात. यंदाचे 2024 चे वर्ष देखील कंपनीसाठी खास ठरले आहे.
2024 हे वर्ष Maruti Ertiga साठी उत्तम वर्ष ठरले आहे. कंपनीने यावर्षी विक्रीचे अनेक टप्पे गाठले आहेत. अशा स्थितीत वर्ष संपण्यापूर्वीच कंपनीने अजून एक मोलाचा आणि तितकाच अभिमानास्पद टप्पा पार केला आहे. खरं तर, 7-सीटर एर्टिगा, जी गेल्या काही महिन्यांत कंपनीसाठी सर्वात लोकप्रिय झाली आहे, तिच्या हरियाणामधील मानेसर प्लांटमध्ये मोठे यश मिळाले आहे. कंपनीने एका कॅलेंडर वर्षात 20 लाख वाहनांचे उत्पादन पार केले आहे. एका वर्षात ही दमदार कामगिरी करणारी मारुती ही देशातील पहिली कार कंपनी ठरली आहे.
Bharat Mobility 2025 मध्ये Tata ची ‘ही’ खास कार होऊ शकते लाँच, जाणून घ्या किंमत
कंपनीने 17 डिसेंबर रोजी सांगितले की 20 लाख वाहनांपैकी सुमारे 60% हरियाणात आणि 40% गुजरातमध्ये तयार होत आहे. यामध्ये बलेनो, फ्रंटएक्स, एर्टिगा, वॅगनआर आणि ब्रेझा ही या वर्षी कंपनीने उत्पादित केलेली टॉप-5 कार्स होती. मारुती सुझुकीने नोव्हेंबरमध्ये 1,81,531 युनिट्सच्या विक्रीत वार्षिक 10 टक्क्याची वाढ नोंदवली आहे.
मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ हिसाशी ताकेउची म्हणाले की, 20 लाख उत्पादनाचा टप्पा हा भारताच्या उत्पादन क्षमतेचा आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमासाठी आमच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. हे यश आमचे पुरवठादार आणि डीलर्स तसेच आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी, राष्ट्र उभारणीला पाठिंबा देण्यासाठी आणि भारताच्या ऑटोमोबाईल उद्योगाला स्वावलंबी आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी आमची वचनबद्धता दर्शवते. हरियाणा आणि गुजरात सुविधांची एकत्रित उत्पादन क्षमता 2.35 दशलक्ष युनिट्स आहे. भारत आणि जगामध्ये वाढत्या मागणीचा अंदाज घेऊन, मारुतीची क्षमता 4 दशलक्ष युनिट्सपर्यंत वाढवण्याची योजना आहे. मारुती सुझुकी 1 दशलक्ष युनिट्सच्या वार्षिक क्षमतेसह आणखी एका ग्रीनफिल्ड सुविधेची योजना करत आहे. यासाठी कंपनी सध्यातरी लोकेशन शोधत आहे.
मार्केटमध्ये लवकरच दाखल होणार Maruti Grand Vitara 7-Seater, नव्या डिझाइनसह स्पॉट झाली कार