फोटो सौजन्य: @Xiaomi (X.com)
सध्या भारतसह जागतिक ऑटो बाजारात इलेक्ट्रिक वाहनांना कमालीची मागणी मिळत आहे. हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये दमदार इलेक्ट्रिक कार ऑफर करत आहे. चीनमध्ये सुद्धा इलेक्ट्रिक कार्सच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भारतात देखील चिनी ऑटो कंपनी BYD आपल्या दमदार इलेक्ट्रिक कार विकत आहे. मात्र, आज आपण अशा एका चिनी इलेक्ट्रिक कारबद्दल जाणून घेणार आहोत, जिला अमेरिकेत दमदार मागणी मिळत आहे.
चिनी टेक कंपनी शाओमीची नवीन इलेक्ट्रिक कार YU7 SUV बाजारात लाँच होताच ग्राहकांनी या कारसाठी रांगा लावल्या आहेत. लाँच झाल्यानंतर अवघ्या 18 तासांतच या कारला 2.4 लाखांहून अधिकची बुकिंग मिळाली आहे. यावरून या कारची वाढणारी लोकप्रियता दिसून येते. कंपनीने फक्त एक वर्षापूर्वीच त्यांची पहिली कार SU7 सेडान लाँच केली होती.
कारची एक्स शोरूम स्वस्त मात्र ऑन रोड किंमत महाग, नक्की भानगड काय? सोप्या पद्धतीने जाणून घ्या
U7 लाँच झाल्यानंतर तीन मिनिटांतच, या कारला 2 लाख रिफंडेबल प्री-बुकिंग मिळाले होते. एका तासातच हा आकडा 2.89 लाखांवर पोहोचला, त्यापैकी 2.4 लाख लोकांनी ते कन्फर्म केलेल्या ऑर्डरमध्ये रूपांतरित केले. चीनमध्ये बुकिंगसाठी तीन पर्याय होते, एक सामान्य प्री-ऑर्डर जी एका आठवड्यात कन्फर्म होते, एक नॉन-रिफंडेबल इन्स्टंट ऑर्डर आणि तिसरा “प्रायोरिटी डिलिव्हरी” पर्याय जो आता उपलब्ध नाही. ऑटो इंडस्ट्रीतील हा जबरदस्त प्रतिसाद शाओमीसाठी एक मोठे यश आहे. हा ब्रँड फक्त स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी ओळखला जात होता, मात्र आता कंपनी आपल्या कारसाठी देखील ओळखली जात आहे.
मे 2025 मध्ये लाँच झालेली, YU7 SUV ही Xiaomi च्या SU7 सेडान आणि Porsche Macan आणि Ferrari Purosangue सारख्या लक्झरी SUV पासून प्रेरित होऊन डिझाइन केलेली आहे. ही कार सिंगल मोटर आणि ड्युअल मोटर दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. बेस मॉडेल रियर-व्हील ड्राइव्ह आहे. ड्युअल मोटर व्हर्जनमध्ये ऑल-व्हील ड्राइव्ह आहे, जी एकूण 288kW पॉवर आणि 528Nm टॉर्क देते. रिअर-व्हील ड्राइव्ह आणि 96.3kWh बॅटरी पॅकची रेंज 835 किमी पर्यंत आहे. मात्र, ऑल-व्हील ड्राइव्ह प्रो मॉडेलमध्ये ही रेंज 760 किमी पर्यंत आहे.
भारतातील ‘या’ व्यक्तीकडे आहे सर्वात महागडी कार, किंमत एवढी की मुंबईत बंगला बांधून सुद्धा पैसे उरतील
या इलेक्ट्रिक कारची सुरुवातीची किंमत 253,500 युआन आहे, जी चीनमधील टेस्ला मॉडेल Y च्या सुरुवातीच्या किमतीपेक्षा सुमारे 10,000 युआन कमी आहे. यामुळे ती मिड-प्रीमियम EV SUV कॅटेगरीमध्ये एक मजबूत पर्याय बनते.