आली रे आली नवीन Kia Seltos आली! पहिल्या टिझरची झलक लवकरच येणार पाहता
टीझरमध्ये सेल्टोसची अधिक आकर्षक, प्रीमियम आणि आधुनिक डिझाइन शैली दाखवण्यात आली आहे, ज्यामधून तिच्या आयकॉनिक सिल्हूटचे बोल्ड इव्हॉल्युशन स्पष्टपणे जाणवते. २०१९ मध्ये लाँच झाल्यापासून सतत यशाच्या शिखरावर चढत आलेली सेल्टोस आता संपूर्णपणे रिडिझाइन करण्यात आली असून, भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्या मिड-एसयूव्ही सेगमेंटमध्ये कियाचे नेतृत्व अधिक बळकट करण्यास सज्ज आहे.
कियाच्या ‘Opposites United’ डिझाइन तत्त्वज्ञानावर आधारित ऑल-न्यू किया सेल्टोस ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनातून पुन्हा डिझाइन करण्यात आली आहे. दमदार एसयूव्ही स्टायलिंग, हाय-टेक प्रपोर्शन आणि अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह ती कियाच्या सर्वसमावेशक आणि आधुनिक डिझाइन भाषेचे प्रतीक ठरते. नवीन प्रमाण, अधिक शार्प लाइन आणि शक्तिशाली पवित्रा यांसह सेल्टोस भारतीय ग्राहकांच्या आधुनिक जीवनशैलीशी जुळणारे व्हिज्युअली स्ट्रॉंग प्रेसेन्स देते. मागील पिढ्यांचा उत्साह आणि कियाच्या आधुनिक इनोव्हेशन्सचा स्लीक, एअरोडायनॅमिक फिनिश तिच्या बाह्य डिझाइनमध्ये उत्तम प्रकारे एकत्रित केला आहे.
ऑल-न्यू किया सेल्टोसचा दमदार बॉडी प्रपोर्शन, मस्क्युलर क्लॅडिंग आणि अचूक सरफेसिंग यांमधून आत्मविश्वास आणि गतीशीलता प्रतिबिंबित होते. पुढील बाजूस नवीन किया Digital Tiger Face Grill असून, मागील बाजूस दिलेले सिग्नेचर Star Map Lighting वेईकलला ‘कनेक्टेड आणि फ्यूचरिस्टिक’ ओळख प्रदान करते. फ्लश डोअर हँडल्ससारखे फीचर्स कारच्या सौंदर्यात भर घालताना एकाचवेळी व्यवहार्यता देखील वाढवतात. प्रत्येक डिझाइन घटक भारतीय ड्रायव्हर्सच्या गरजा आणि ड्रायव्हिंग पॅटर्न लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे.
Range Rover नाही तर ‘या’ SUV मधून PM Modi आणि Putin यांचा प्रवास, कारला VIP नंबर प्लेट देखील नाही
या कारच्या अनावरणाबाबत प्रतिक्रिया देताना किया इंडियाचे एमडी आणि सीईओ ग्वांगू ली म्हणाले, “सेल्टोसने नेहमीच मिड-एसयूव्ही श्रेणीत नवे मापदंड स्थापित केले आहेत आणि या नवीन पिढीमुळे ही कार एका नव्या उंचीवर पोहोचेल. ऑल-न्यू किया सेल्टोस ही भारतीयांच्या प्रिय मिड-एसयूव्हीची बोल्ड आणि प्रगत उत्क्रांती आहे. आकर्षक डिझाइनपासून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित कार्यक्षमतेपर्यंत प्रत्येक तपशील ग्राहकांच्या अपेक्षा आणि महत्त्वाकांक्षा लक्षात घेऊन विकसित करण्यात आली आहे. टीझरमधून या सर्वाचे रोमांचक दर्शन होते आणि आम्ही भारतात अधिक स्टायलिश, अधिक प्रीमियम आणि अधिक सक्षम सेल्टोस लवकरच सादर करण्यास उत्सुक आहोत.”






