फोटो सौजन्य: iStock
भारतात अनेक ऑटो कंपन्या आहेत, त्या बेस्ट कार ऑफर करत असतात. यातही सर्वात जास्त मागणी ही त्या कार्सना असते ज्यावर ग्राहकांना चांगला डिस्काउंट मिळत आहे. ग्राहकांना सुद्धा आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्या कॅश डिस्काउंट आणि अन्य बेनिफिट्स करत असतात. आता अशाच भन्नाट ऑफर्स Tata पासून ते Kia पर्यंतच्या कंपन्या ऑफर करत आहे.
2025 च्या सणासुदीच्या हंगामापूर्वी, जवळजवळ सर्व प्रमुख इलेक्ट्रिक कार कंपन्या त्यांच्या मॉडेल्सवर मोठ्या डिस्काउंट ऑफर करत आहेत. जर तुम्ही इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ऑगस्ट महिना तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकतो. लक्षात घ्या, मॉडेल आणि शहरानुसार डिस्काउंटची रक्कम बदलू शकते.
लवकरच Mahindra BE6 Black Edition चे आगमन होणार, मिळणार फास्ट चार्जिंग आणि लॉन्ग रेंज
फेसलिफ्टनंतर, नवीन Kia EV6 आता फक्त GT-Line AWD व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यात नवीन डिझाइन, अपडेटेड इंटीरियर, मोठा आणि चांगला बॅटरी पॅक आणि आहे. बहुतेक डीलरशिप या कारवर 10 लाख रुपयांपेक्षा जास्त सूट देत आहेत.
महिंद्रा XUV400 ही टाटा नेक्सॉन EV सारखी बाजारात यशस्वी झाली नाही. यामुळे, कंपनी त्यावर स्टॉक क्लिअरन्स ऑफर देत आहे. डीलरशिप आणि स्टॉक उपलब्धतेनुसार, या EV वर 3 लाख रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
MG ZS EV सध्या 2.5 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. दुसरीकडे, लहान कॉमेट ईव्हीवर व्हेरिएंटनुसार 50,000 ते 60,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. एमजीचे विंडसर मॉडेल सध्या सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल आहे, त्यामुळे त्यावर कोणतीही सूट नाही.
एसयूव्ही सारख्या लूकसह आणि 2,540 मिमी व्हीलबेससह, सिट्रोएन ईसी3 थेट Tata Punch EV शी स्पर्धा करते. परंतु, याला अपेक्षित असे यश मिळाले नाही, ज्यामुळे डीलरशिप त्यावर 1.25 लाख रुपयांपर्यंतचे फायदे देत आहेत.
टाटा मोटर्सच्या ईव्ही रेंजमध्ये Tiago EV, Punch EV, Nexon EV, Curvv आणि अलीकडेच लाँच झालेल्या हॅरियर ईव्हीचा समावेश आहे. सध्या, हॅरियर ईव्हीवर फक्त लॉयल्टी बेनिफिट्स उपलब्ध आहेत, परंतु Tiago EV सारख्या कारवर काही ठिकाणी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त सूट दिली जात आहे.