फोटो सौजन्य: iStock
भारतीय बाजारात अनेक कार उत्पादक कंपन्या आहेत, त्यातीलच एक कंपनी म्हणजे रेनॉल्ट. रेनॉल्टने नेहमीच ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार आपल्या कारमध्ये बद्दल केले आहेत. आता मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची जोरदार चर्चा होत आहे. पण असे जरी असले तरी याचा सीएनजी कारच्या विक्रीवर जास्त परिणाम झाला नाही आहे. आजही मार्केटमध्ये ग्राहक मोठ्या प्रमाणात सीएनजी कारची खरेदी करत आहे. हे लक्षात घेऊन, अनेक कंपन्या सीएनजी वाहनं त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करत आहे.
आता रेनॉल्ट देखील CNG कार ऑफर करत आहे. कंपनीच्या कोणत्या कारमध्ये सीएनजी दिले जाते? रेनॉल्टच्या सीएनजी कार किती किमतीत खरेदी करता येतील? त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
Skoda Kodiaq भारतीय बाजारात लवकरच होणार लाँच, Toyota आणि MG सोबत असेल स्पर्धा
रेनॉल्ट आता त्यांच्या कारमध्ये सीएनजी तंत्रज्ञान देखील देणार आहे. कंपनीने 24 फेब्रुवारी 2025 रोजी माहिती दिली की ती त्यांची हॅचबॅक कार Renault Kwid, बजेट एमपीव्ही Renault Triber आणि Renault Kiger ही सीएनजीसह कॉम्पॅक्ट एसयूव्ही म्हणून सादर करते.
रेनॉल्ट त्यांच्या कार सीएनजी तंत्रज्ञानासह देत आहे, परंतु त्यात फॅक्ट-फिटेड सीएनजी दिले जाणार नाही; त्याऐवजी, रेनॉल्ट एक रेट्रोफिटमेंट किट देत आहे. अशा परिस्थितीत, जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या रेनॉल्ट कारमध्ये सीएनजी बसवायचे असेल, तर त्याला कंपनीच्या मान्यताप्राप्त डीलरकडे जावे लागेल आणि सीएनजी किट बसवता येईल.
EV पेक्षा CNG Cars चा बोलबाला जास्त ! रोजच्या प्रवासासाठी ‘या’ CNG कार आहेत बेस्ट
रेनॉल्ट इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर वेंकटराम एम म्हणाले की, आम्ही नेहमीच नवीन तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक पद्धतींवर काम करत असतो. या तत्वज्ञानाला अनुसरून, आम्ही आमच्या सर्व मॉडेल्समध्ये सरकार मान्यताप्राप्त सीएनजी किट बसवण्याचा पर्याय देऊ केला आहे. याचा अर्थ असा की ग्राहक त्यांच्या रेनॉल्ट कारमध्ये सीएनजी किट बसवून सीएनजी तसेच पेट्रोलवर चालवू शकतील. कंपनीचा असा विश्वास आहे की यामुळे रेनॉल्ट कार अधिक सुलभ आणि उपयुक्त होतील आणि भारतात तिचे स्थान मजबूत होईल.
कंपनीच्या कारमध्ये सीएनजी बसवण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागेल, अशी माहिती रेनॉल्टने दिली आहे. हॅचबॅक कार क्विडसाठी, कारच्या किमतीव्यतिरिक्त 75 हजार रुपये देऊन सीएनजी किट बसवता येते. तर ट्रायबर आणि किगरमध्ये सीएनजी किट बसवण्यासाठी 79500 रुपये द्यावे लागतील.
जर कोणत्याही व्यक्तीने कंपनीने मान्यता दिलेल्या डीलरकडून त्याच्या रेनॉल्ट कारमध्ये सीएनजी किट बसवले तर कारची वॉरंटी रद्द होणार नाही. सीएनजी बसवल्यावर, कंपनी स्वतः तीन वर्षांची वॉरंटी देईल.
दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र यासारख्या राज्यांमध्ये रेनॉल्टकडून प्रथम सीएनजी तंत्रज्ञान पुरवले जाईल. यानंतर, ही सुविधा इतर राज्यांमध्ये देखील दिली जाईल.