फोटो सौजन्य;@TamilTechOffici(X.com)
भारतीय मार्केटमध्ये आता हळूहळू ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीकडे वळताना दिसत आहे. त्यामुळे मार्केटमध्ये आता इलेक्ट्रिक कार सोबतच दुचाकी देखील मोठ्या प्रमाणात उत्पादित केल्या जात आहे. यात अनेक कंपन्या आता आपल्या इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटरमध्ये दमदार रेंज आणि फीचर्स देखील देताना दिसत आहे.
जर तुम्हालाही पेट्रोलपासून मुक्ती मिळवायची असेल, तर इलेक्ट्रिक वाहन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. यासोबतच, जर तुम्हाला तुमच्या पेट्रोल टू-व्हीलरवरून इलेक्ट्रिक व्हीलवर स्विच करायचे असेल तर Hero Vida V2 हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. हिरोच्या या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत फक्त 74 हजार रुपये आहे. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू शकते.
EV क्षेत्रात भारताचा दबदबा, ‘या’ राज्यात उभारले जाणार जगातील दुसरे सर्वात मोठे EV चार्जिंग नेटवर्क
हिरो मोटोकॉर्प तीन वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये विडा व्ही२ इलेक्ट्रिक स्कूटर विकते. देशाची राजधानी दिल्लीत Hero Vida V2 ची ऑन-रोड किंमत सुमारे 79 हजार रुपये आहे. यासोबतच, तुमच्यासाठी मोठी गोष्ट म्हणजे एकाच वेळी पूर्ण पेमेंट करण्याऐवजी, तुम्ही फक्त 10,000 रुपयांचे डाउन पेमेंट करून फायनान्स देखील करू शकता.चला जाणून घेऊया या इलेक्ट्रिक स्कूटरची EMI प्रोसेस काय असेल?
जर तुम्ही दिल्ली-एनसीआरमध्ये 79000 रुपयांच्या ऑन-रोड किमतीवर 10000 रुपयांचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला बँकेकडून 69000 रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्ही बँकेकडून 10 टक्के व्याजदराने 3 वर्षांसाठी कर्ज घेऊ शकता. अशा प्रकारे, तुम्हाला 36 महिन्यांसाठी सुमारे 2300 रुपये ईएमआय भरावे लागतील. जर तुम्ही कर्जावर Hero Vida V2 खरेदी केले तर तुम्हाला फक्त 11,000 रुपये EMI म्हणून द्यावे लागतील.
उन्हाळ्यातील ‘या’ 3 चुका करतील तुमच्या कारला भस्मसात, वेळीच राहा सावध
हिरो विडा व्ही2 च्या बेस लाईट मॉडेलमध्ये 2.2 किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे. ते एका चार्जमध्ये 94 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते. हिरोच्या या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 69 किमी प्रतितास आहे.
ही इलेक्ट्रिक स्कूटर स्मार्ट फीचर्सने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 7-इंचाचा TFT टचस्क्रीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, रिजन ब्रेकिंग आणि क्रूझ कंट्रोल सारख्या फीचर्सचा समावेश आहे. तुम्ही हीरोची ही इलेक्ट्रिक स्कूटर मॅट नेक्सस ब्लू-ग्रे आणि ग्लॉसी स्पोर्ट्स रेड सारख्या रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकता.