फोटो सौजन्य: iStock
इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. जिथे आधी रस्त्यावर इंधनावर चालणारी वाहनं मोठ्या प्रमाणात दिसायची. तेच आता इलेक्ट्रिक वाहनं मोठ्या प्रमाणात दिसत आहे. भारतीय ग्राहक देखील वाढत्या इंधनाच्या किमतींना कंटाळून आता इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीकडे वळताना दिसत आहे. सरकार देखील EV वापराबद्दल नागरिकांना जास्तीतजास्त प्रोत्साहित करत आहे. आता तर देशात जगातील दुसरे मोठे EV चार्जिंग नेटवर्क उभारले जाणार आहे.
कोण म्हणतं भारतात Luxury Cars विकल्या जात नाहीत? FY2025 मध्ये ग्राहकांनी भरभरून खरेदी केली ‘ही’ कार
भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्याच वेळी, भारताच्या ईव्ही इंफ्रास्ट्रक्चर सुविधा मजबूत करण्यासाठी चार्जिंग स्टेशन उभारले जात आहेत. आता पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे जगातील दुसरे सर्वात मोठे चार्जिंग स्टेशन उघडणार आहे, ज्यामध्ये एकाच वेळी 300 वाहने चार्ज करता येतील. हे भारतातील सर्वात मोठे चार्जिंग स्टेशन असेल.
हे ईव्ही चार्जिंग स्टेशन ऑगस्ट 2025 पर्यंत भारतात सुरू केले जाऊ शकते. पश्चिम बंगालमधील दक्षिण कोलकाता येथील ठाकूरपुकुर येथे या स्टेशनचे बांधकाम सुरू आहे. या ईव्ही चार्जिंग हबमध्ये 120 किलोवॅट प्रति तास पर्यंत लोड क्षमता असलेले स्लो आणि फास्ट दोन्ही चार्जर आहेत. कोलकात्यातील या चार्जिंग हबमध्ये 20 टक्के जलद चार्जर असतील.
जगातील सर्वात मोठे इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन चीनमध्ये आहे, जिथे एकाच वेळी 650 वाहने चार्ज करता येतात. या बाबतीत, भारत आता फक्त त्याच्या शेजारील देश चीनपेक्षा मागे आहे. कोलकातामध्ये हे ईव्ही चार्जिंग स्टेशन उघडण्यापूर्वी, गुरुग्राममध्ये बांधलेले चार्जिंग स्टेशन हे देशातील सर्वात मोठे ईव्ही चार्जिंग हब आहे, जिथे एकाच वेळी 160 वाहने चार्ज करता येतात.
जर Honda CB300R मध्ये दिसली ‘ही’ समस्या तर तात्काळ कंपनीला करा संपर्क, फुकटात होईल दुरुस्ती
2024 मध्ये भारताने इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीतील सर्व विक्रम मोडले. गेल्या वर्षी 19,49,114 युनिट्स इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली. या आकडेवारीनुसार, भारतात दररोज सुमारे 5,325 इलेक्ट्रिक वाहने विकली जात होती. 2023 च्या तुलनेत, इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत 27 टक्क्यांनी वाढ झाली. CY23 मध्ये 15,32,389 युनिट्स इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली. यापैकी 59 टक्के विक्री दुचाकी वाहनांची आहे. देशात इलेक्ट्रिक बसेसच्या विक्रीतही 59 टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या वर्षी इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेईकलच्या विक्रीत देखील 22 टक्क्यांची वाढ झाली.