फोटो सौजन्य - Social Media
ओबेन इलेक्ट्रिक या संशोधन व विकास-आधारित इलेक्ट्रिक मोटरसायकल उत्पादक कंपनीने आपल्या ग्राहक सेवा अनुभवाला अधिक प्रगल्भ करत २४/७ ग्राहक सेवा हेल्पलाइन सुरू केली आहे. इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात सेवा आणि तांत्रिक सहाय्याची कमतरता अनेकदा ग्राहकांच्या मनात शंका निर्माण करते, मात्र ओबेनचा हा उपक्रम विश्वासार्हतेचा नवा टप्पा गाठणारा आहे.
ही हेल्पलाइन तांत्रिक अडचणींवर तत्काळ उपाय देण्याबरोबरच, रिअल-टाईम मार्गदर्शन आणि वैयक्तिक सहाय्य पुरवते. या उपक्रमाबद्दल बोलताना ओबेन इलेक्ट्रिकच्या संस्थापक आणि सीईओ मधुमिता अग्रवाल म्हणाल्या, “ग्राहकांचा विश्वास हा इव्ही स्वीकारण्याच्या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आमची २४/७ सेवा आणि एकात्मिक ओबेन केअर प्रणाली यामुळे ग्राहकांमध्ये दीर्घकालीन नातं निर्माण होतं.”
गेल्या ३ महिन्यांत सेवा दिलेल्या ९०% प्रकरणांमध्ये ७२ तासांच्या आत समस्या सोडवण्यात आल्या आहेत. यामागचं एक कारण म्हणजे ओबेनची स्वतःच्या एलएफपी बॅटरी, मोटर, व्हेईकल कंट्रोल युनिट आणि चार्जर डिझाइन व उत्पादनाची क्षमता, ज्यामुळे निदान आणि दुरुस्ती अधिक जलद आणि अचूक होते. ओबेन प्रत्येक ग्राहकाला रिलेशनशिप मॅनेजर नियुक्त करते, जो ऑनबोर्डिंगपासून देखभाल आणि तांत्रिक सहाय्यापर्यंत संपूर्ण मार्गदर्शन करतो. हे समर्थन ओबेन केअरच्या प्लॅटिनम-प्रमाणित तंत्रज्ञ नेटवर्ककडून मिळते, जे अत्यंत प्रशिक्षित आणि व्यावसायिक आहेत.
अत्यावश्यक स्थितींसाठी ओबेनने तीन-स्तरीय रोडसाईड असिस्टन्स (RSA) नेटवर्क विकसित केले आहे, ज्यामध्ये त्यांची स्वतःची फ्लीट, आरएसए सेवा पुरवणारे आणि स्थानिक भागीदार यांचा समावेश आहे. एलएफपी बॅटरीवर ८ वर्षे/८०,००० किमी वॉरंटी आणि इतर मुख्य घटकांवर ५ वर्षे/६०,००० किमी वॉरंटी दिली जाते. ओबेनची पॅन-इंडिया उपस्थिती सध्या ३७ शोरूम्सपर्यंत पोहोचली असून, प्रत्येक शोरूमसोबत समर्पित सेवा केंद्र जोडलेलं आहे. काही ठिकाणी पिक-अप आणि ड्रॉप सेवाही दिली जाते. आगामी काळात ओबेन ५०+ शहरांमध्ये १५०+ शोरूम्स आणि सेवा केंद्रे सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे.