फोटो सौजन्य: @whatcar (x.com)
सिट्रोएनने त्यांची दुसरी जनरेशन Citroen C5 Aircross डिजिटल पद्धतीने ग्लोबल लेव्हलवर सादर केली आहे. नवीन स्टेलांटिस STLA मिडीयम प्लॅटफॉर्मवर आधारित, ते हायब्रिड, प्लग-इन हायब्रिड आणि इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये ऑफर केले जाते. दुसऱ्या जनरेशनमधील सिट्रोएन सी5 एअरक्रॉसची विक्री या वर्षाच्या मध्यानंतर युरोपमध्ये सुरू होईल. तर त्याचे उत्पादन फ्रान्समधील रेनेस येथील ब्रँड प्लांटमध्ये होईल. ही एसयूव्ही 2025 च्या अखेरीस भारतीय मार्केटमध्ये एंट्री मारू शकते. गेल्या काही वर्षांपासून भारतात या कारची विक्री खूपच कमी झाली आहे. गेल्या 5 महिन्यांत या कारचे फक्त 1 युनिट विकले गेले आहे.
नवीन जनरेशनच्या C5 एअरक्रॉसमध्ये पुढच्या भागात मॅट्रिक्स एलईडी हेडलॅम्प आहेत, जे ग्लॉस ब्लॅक स्ट्रिपद्वारे जोडलेले आहेत. सिट्रोएनने प्रोडक्शन-स्पेक मॉडेलमध्ये हलके विंग्स कायम ठेवले आहेत, जे 2024 च्या पॅरिस मोटर शोमध्ये कॉन्सेप्ट व्हर्जनवर दिसले आहे.
आणि म्हणूनच ‘या’ कारणांमुळे इलेक्ट्रिक वाहनांना येत आहे सुगीचे दिवस
दुसऱ्या जनरेशनमधील C5 एअरक्रॉस त्याच्या आधीच्या मॉडेलपेक्षा आकाराने मोठा आहे. त्याची लांबी 4,652 मिमी (+150 मिमी) आणि रुंदी 1,902 मिमी आहे. व्हीलबेस देखील 60 मिमीने वाढवण्यात आला आहे आणि आता तो 2784 मिमी झाला आहे. एसयूव्हीचा ग्राउंड क्लीयरन्स 200 मिमी आहे. कोणत्याही सिट्रोएनसाठी प्रथमच, ते 20 इंचांपर्यंतच्या व्हील्सच्या आकारात उपलब्ध असेल.
या कारची आतील केबिन ‘सी-झेन लाउंज’ डिझाइनवर आधारित आहे, ज्यामध्ये लांब डॅशबोर्ड आहे. यात 8 कलर्सच्या पर्यायांसह एक अँबियंट लाइटिंग सिस्टम देखील आहे, जी कोणत्याही सिट्रोएन कारसाठी पहिली आहे. या एसयूव्हीमध्ये नवीन सिट्रोएन अॅडव्हान्स्ड कम्फर्ट फ्रंट सीट्स आहेत, ज्यात 10-वे इलेक्ट्रिकल अॅडजस्टमेंट, हीटिंग, व्हेंटिलेशन आणि मसाज फंक्शन आहे. मागील सीट्समध्ये हीटिंग फंक्शन देखील आहे.
सिट्रोएनचा दावा आहे की दुसऱ्या जनरेशनमधील C5 एअरक्रॉसमध्ये स्टेलांटिसने सादर केलेली सर्वात मोठी सेंट्रल एचडी टचस्क्रीन आणि लेटेस्ट जनरेशनमधील इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. हे 3D नेव्हिगेशन, वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto, OpenAI चे ChatGPT, ब्लूटूथद्वारे ड्युअल स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि “Hello Citroen” व्हॉइस रेकग्निशन सिस्टम अशा अनेक फीचर्स सुसज्ज आहे. एसयूव्हीमध्ये लेव्हल 2 ADAS टेक्नॉलॉजी, VisioPark 360 डिग्री कॅमेरा आणि पॅनोरॅमिक ग्लास रूफ देखील आहे.