GST कमी झाला असतानाच 'या' 5 बाईक्सच्या टॅक्समध्ये होणार वाढ (फोटो सौजन्य: iStock)
गेल्या कित्येक वर्षांपासून सामान्य नागरिकांची मागणी होती की वाहनांवरील जीएसटी टॅक्स कमी करण्यात यावा. अखेर, केंद्र सरकारने सामान्य नागरिकांची हाक ऐकली आणि GST कमी करण्याबाबत घोषणा केली. यामुळे वाहन खरेदीदारांना दिलासा मिळणार आहे.
भारत सरकारने जीएसटी स्लॅबमध्ये मोठा बदल केला आहे. 22 सप्टेंबर 2025 पासून 350 सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या बाईक्सवरील टॅक्स 40% असेल. या निर्णयामुळे अनेक लोकप्रिय बाईक्स हजारो रुपयांनी महाग होतील. जर तुम्ही या महिन्यात बाईक्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे. मात्र, कोणत्या बाईक्स महाग होणार आहेत त्याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात.
Tata Motors कडून ग्राहकांसाठी मोठी भेट! कमर्शियल गाड्यांच्या किमतीत मोठी कपात
बजाज पल्सर NS400Z ही भारतातील सर्वात स्वस्त 400cc बाईक मानली जाते, ज्याची किंमत 2 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. याचा परफॉर्मन्स आणि परवडणारी किंमत यामुळे ती नेकेड स्ट्रीट बाईक सेगमेंटमध्ये खूप लोकप्रिय आहे. मात्र, आता 40% टॅक्सवाढमुळे याच्या किमतीत लक्षणीयरीत्या वाढ होईल, ज्यामुळे याच्या विक्रीवर परिणाम होऊ शकतो.
KTM 390 Duke तिच्या शार्प नेकेड स्ट्रीटफायटर डिझाइनसाठी ओळखली जाते, तर KTM RC 390 याच्या फुल फेअरिंग लूक आणि स्पोर्टी परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते. दोन्ही बाईकच्या त्यांच्या सेगमेंटमध्ये चांगली पकड आहे. पण नवीन टॅक्स लागू झाल्यानंतर, त्या खरेदी करणे ग्राहकांना थोडे जड जाणार हे नक्की.
Triumph Speed 400 ने भारतीय बाजारात आपली पकड मजबूत केली आहे. किफायतशीर किंमत आणि उत्कृष्ट क्वालिटीमुळे ही बाईक तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय ठरत आहे. याशिवाय कंपनी Scrambler 400X, Speed T4 आणि Thruxton 400 यांसारख्या बाईकही विक्रीस उपलब्ध आहेत. मात्र, वाढलेल्या किंमतींमुळे या बाईक खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त पैसे द्यावे लागणार आहे.
रॉयल एनफील्ड हिमालयन 450 ही अॅडव्हेंचर बाईक सेगमेंटमध्ये सर्वात लोकप्रिय बाईक आहे. 2.90 लाख रुपयांपेक्षा कमी किंमत असलेली ही 450 सीसी श्रेणीतील सर्वात परवडणारी बाईक आहे. मात्र, आता जीएसटीमध्ये वाढ झाल्यानंतर, ग्राहकांच्या खिश्याला कात्री बसणार आहे.
जर तुम्ही ३५० सीसीपेक्षा जास्त बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर २२ सप्टेंबरपूर्वी ती खरेदी करणे चांगले होईल. जीएसटीमध्ये वाढ झाल्यानंतर, बजाज पल्सर एनएस४००झेड, केटीएम ३९० ड्यूक, आरसी ३९०, ट्रायम्फ स्पीड ४०० आणि रॉयल एनफील्ड हिमालयन ४५० सारख्या बाईक हजारो रुपयांनी महाग होतील.