तुमची आवडती सर्वात स्वस्त बाईक झाली महाग, काय आहे नवीन किंमत? जाणून घ्या... (फोटो सौजन्य-X)
Royal Enfield Bullet 350 In Marathi: रॉयल एनफिल्ड ही भारतातील सर्वात लोकप्रिय बाईक उत्पादकांपैकी एक आहे. रॉयल एनफिल्डची बाईक विकत घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. रॉयल एनफिल्डची बुलेट ही आवडत नाही असे म्हणणारे फारच क्वचित लोक असतील. रॉयल एनफील्ड बुलेट ३५० ही फक्त एक बाईक नाही तर भारतातील एक प्रतिष्ठित ओळख आहे. ही अशी मोटरसायकल आहे, ज्याचे जवळजवळ प्रत्येक बाईक प्रेमी वेडा आहे.
या बाईकमध्ये ३४९ सीसी जे-सिरीज इंजिन आहे, जे २०.२ एचपी पॉवर आणि २७ एनएम टॉर्क जनरेट करते. या बाईकचे इंजिन क्लासिक ३५० आणि हंटर ३५० मध्ये देखील आहे. त्याचा ५-स्पीड गिअरबॉक्स राईड सुरळीत करतो आणि लांब टूरिंगमध्येही सोयीस्कर ठरते.
डिझाइन कशी आहे?
या बाईकच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर, ही बाईक अजूनही रेट्रो लूकसह येते, ज्यामध्ये गोल हेडलाइट्स, मेटल फ्युएल टँक, रुंद साइड पॅनेल आणि शक्तिशाली थंप साउंड समाविष्ट आहे.
रॉयल एनफील्डने त्यांच्या आयकॉनिक बाईक बुलेट ३५० च्या किमतीत २००० ते ३,००० पर्यंत वाढ केली असून जी व्हेरिएंटनुसार बदलते. जून २०२५ च्या अपडेटेड किंमत यादीनुसार, मिलिटरी रेड आणि ब्लॅक व्हेरिएंटची किंमत पूर्वी १,७३,५६२ होती, जी आता १,७५,५६२ पर्यंत वाढली आहे. त्याचप्रमाणे, स्टँडर्ड ब्लॅक आणि मरून व्हेरिएंटची किंमत १,७९,००० वरून १,८१,००० पर्यंत वाढली आहे. सर्वात महागडा ब्लॅक गोल्ड व्हेरिएंट आता २,१५,८०१ ऐवजी २,१८,८०१ मध्ये उपलब्ध असेल, म्हणजेच ३,००० अधिक. या सर्व किमती दिल्लीच्या एक्स-शोरूमनुसार आहेत.
कंपनीने किंमत वाढवण्याचे कोणतेही अधिकृत कारण दिलेले नाही. परंतु ऑटो उद्योगात इनपुट खर्चात वाढ (जसे की स्टील, कामगार, पुरवठा साखळी), नवीन रंग किंवा ग्राफिक्सची ऑफर आणि बाजारातील स्थिती लक्षात घेता असे बदल सहसा केले जातात. हे देखील सूचित करते की ब्रँड बाजारातील ट्रेंडनुसार सतत त्याची उत्पादने अपडेट करत आहे.
तसे बुलेट ३५० मध्ये ३४९ सीसी सिंगल-सिलेंडर, एअर-ऑइल कूल्ड इंजिन आहे जे ६,१०० आरपीएमवर २०.२ बीएचपी पॉवर आणि ४,००० आरपीएमवर २७ एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ब्रेकिंग सिस्टममध्ये समोर डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने, त्यात एबीएस सिस्टम आहे. मिलिटरी व्हेरिएंटमध्ये सिंगल चॅनेल एबीएस आणि ब्लॅक गोल्ड व्हेरिएंटमध्ये ड्युअल चॅनेल एबीएस उपलब्ध आहे. रंग पर्यायांमध्ये मिलिटरी रेड, ब्लॅक, स्टँडर्ड मरून आणि ब्लॅक गोल्ड यांचा समावेश आहे.