Shefali Jariwala च्या कलेक्शनमध्ये महागड्या कारचा समावेश, सुरवातीची किंमतच कोटींपासून सुरु
अभिनेत्री शेफाली जरीवालाने वयाच्या 40व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. Kaanta Laga या गाण्याने तिने प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले होते. वैयक्तिक आयुष्याबरोबरच शेफाली तिच्या लक्झरी लाईफस्टाईलमुळेही चर्चेत होती.
शेफाली आणि तिचा पती पराग त्यागी यांना 1.5 कोटी रुपयांच्या पोर्श 718 बॉक्सस्टर कन्व्हर्टेबल कारमध्ये अनेकदा पाहिले गेले आहे. या आलिशान स्पोर्ट्स कारमध्ये असे फीचर्स आहेत, जे प्रत्येक कार प्रेमींना चांगले वाटते. चला या आलिशान कारबद्दल जाणून घेऊयात.
Porsche 718 बॉक्सस्टर ही एक हाय परफॉर्मन्स देणारी कन्व्हर्टेबल स्पोर्ट्स कार आहे, जी पॉवर, स्टाइल आणि तंत्रज्ञानाचे संपूर्ण पॅकेज देते. ही कार 2.0 लिटर आणि 2.5 लिटर टर्बोचार्ज्ड 4-सिलेंडर बॉक्सर इंजिनच्या पर्यायांसह येते, जी 300 ते 350 हॉर्सपॉवरपर्यंतची पॉवर जनरेट करते. या कारमध्ये 6-स्पीड मॅन्युअल किंवा 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक (PDK) ट्रान्समिशन आहे. त्याचा टॉप स्पीड सुमारे 270+ किमी प्रतितास आहे. ही कार फक्त 4.2 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग घेऊ शकते.
बाबो ! रस्त्यावर दिसली दुमजली इमारती एवढी भल्ली मोठी कार, फक्त एका टायरची किंमत 21 लाख रुपये
या कारच्या तंत्रज्ञान आणि फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, त्यात पोर्श अॅक्टिव्ह सस्पेंशन मॅनेजमेंट (PASM) आहे, जे त्याची हँडलिंग आणखी सुधारते, तर पोर्श स्टेबिलिटी मॅनेजमेंट (PSM) कठीण परिस्थितीतही संतुलन राखण्यास मदत करते. ही कार नॉर्मल, स्पोर्ट आणि स्पोर्ट प्लस सारख्या ड्रायव्हिंग मोडसह येते. रेसिंगसारखा ड्रायव्हिंग अनुभव देण्यासाठी स्पोर्ट्स क्रोनो पॅकेज देखील उपस्थित आहे.
या कारच्या इंटिरिअरमध्ये 7-इंच टचस्क्रीन, पोर्श कम्युनिकेशन सिस्टम, व्हॉइस कमांड सपोर्ट, USB आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, ड्युअल-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि व्हेंटिलेटेड सीट्स सारखे फीचर्स आहेत.
प्रवाशांच्या सेफ्टीच्या बाबतीत, ही कार 4 एअरबॅग्ज (समोर आणि बाजूला), ट्रॅक्शन कंट्रोल, मागील आणि समोर पार्किंग सेन्सर्स, पार्क असिस्ट सिस्टम आणि ऑटोमॅटिक ब्रेकिंग सिस्टम सारख्या प्रगत फीचर्ससह येते. LED हेडलाइट्स आणि DRL देखील त्याची व्हिसिबिलीटी आणि लूक सुधारतात.
सेलिब्रिटींची ही आवडती कार होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे याचा उत्तम परफॉर्मन्स आणि एक्सक्लुझिव्ह लूक. ही कार केवळ एक लक्झरी ब्रँड नाही तर एक स्टेटस सिम्बॉल आहे, जी शेफाली जरीवाला सारख्या लोकप्रिय व्यक्तिमत्त्वांनाही आवडते. स्पीड, क्लास आणि आरामाचे कॉम्बिनेशन फार कमी कारमध्ये दिसून येते.