फोटो सौजन्य: supercarblondie (Instagram)
हल्ली मार्केटमध्ये विविध सेगमेंटमध्ये दमदार आणि उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर करत असतात. यातही आताच्या कारमध्ये अनेक उत्तम फीचर्स ऑटो कंपन्या समाविष्ट करत आहे. इलेक्ट्रिक कार्सना देखील मार्केटमध्ये चांगली मागणी मिळत आहे. मात्र, आता एका असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक भल्ली मोठी कार पाहायला मिळत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
तुम्ही जगातील सर्वात लांब कार, सर्वात महागडी कार किंवा सर्वात लहान कारबद्दल नक्की कुठेतरी वाचलं किंवा ऐकले असेलच, पण तुम्ही कधी जगातील सर्वात मोठी कार पाहिली आहे का? या कारची लांबी, उंची आणि रुंदी सामान्य कारपेक्षा जवळजवळ तिप्पट आहे. ही कार पाहिल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदाच विश्वास बसणार नाही.
ही कार इतकी मोठी आहे की जर ५ फूट १० इंच उंचीची व्यक्ती या कारच्या खाली सहज उभी राहिली तरी त्यांना काही होणार नाही. तसेच, ती व्यक्ती कारला स्पर्श न करता त्याच्याखालून जाऊ शकते. म्हणजेच, कारचा ग्राउंड क्लीयरन्स एखाद्या व्यक्तीच्या उंचीपेक्षाही जास्त आहे.
या भल्ल्या मोठ्या कारच्या टायरची सुद्धा चर्चा होताना दिसते. या टायरची किंमत सुमारे 21 लाख रुपये आहे. याचा अर्थ असा की तुम्ही भारतात फक्त एका टायरच्या किमतीत 2 ते 3 चांगल्या कार खरेदी करू शकता. त्यासोबतच हे टायर फक्त मोठे नसून मजबूत देखील आणि जड देखील आहेत.
ही कार एका खास हमर H1 मॉडेलच्या आधारावर बनवण्यात आली आहे. मात्र, ती सामान्य हमरपेक्षा तीन पट लांब, तीन पट जास्त आणि तीन पट रुंद आहे. जर आपण त्याची तुलना सामान्य कार किंवा एसयूव्हीशी केली तर त्यांची उंची या कारच्या टायर्सपर्यंतही पोहोचत नाही.
आता या कारच्या पॉवरबद्दल बोलूया. या कारमध्ये एक नाही तर 4 इंजिन आहेत, जे स्वतंत्रपणे सुरू करता येतात. ड्रायव्हिंग कंट्रोल सिस्टीम पाहता असे वाटते की कोणीतरी ट्रेन चालवत आहे. त्यात चार मोठे टीव्ही स्क्रीन आहेत, जेणेकरून ड्रायव्हरला प्रत्येक दिशेचा संपूर्ण दृश्य पाहता येते.
या कारचा इंटिरिअर देखील एका आलिशान लिव्हिंग रूमसारखा आहे. आत सुमारे 60 चौरस मीटरचा हॉल आहे, ज्यामध्ये आरामदायी सोफा बसवले आहेत. आजूबाजूला मोठे आरसे आहेत आणि प्रत्येक आरशावर मोठे वायपर देखील बसवले आहेत. ड्रायव्हरला आजूबाजूला सर्व काही पाहणे सोपे व्हावे म्हणून, त्यात चार टीव्ही स्क्रीन बसवले आहेत.