फोटो सौजन्य: @shreemallatheru (X.com)
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये अनेक मोठ्या आणि बलाढ्य कंपन्या आहेत. त्यातीलच एक कंपनी म्हणजे टाटा मोटर्स. आतापर्यंत टाटा मोटर्सने देशात अनेक उत्तम कार्स ऑफर केल्या आहेत. यातही कंपनी ग्राहकांच्या मागणीवर विशेष लक्षकेंद्रित करत असते. ज्यामुळे ग्राहक देखील कंपनीच्या कार्सला विशेष प्राधान्य देत असतात. आता कंपनी आपल्या Tata Harrier वर विशेष डिस्कॉऊंट देत आहे.
भारतीय ग्राहकांमध्ये एसयूव्ही सेगमेंटची मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे. जर तुम्हीही येत्या काही दिवसांत नवीन एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच लिहली आहे. खरंतर, टाटा मोटर्स एप्रिल 2025 मध्ये त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही Harrier वर बंपर डिस्काउंट देत आहे. या काळात, ग्राहक टाटा हॅरियर खरेदी करून 75,000 रुपयांपर्यंत बचत करू शकतात. कॅश डिस्काउंट व्यतिरिक्त, या ऑफरमध्ये एक्सचेंज बोनस देखील समाविष्ट आहे. कंपनी येत्या काही दिवसांत टाटा हॅरियरचा इलेक्ट्रिक व्हेरियंट देखील लाँच करणार आहे. डिस्काउंटबद्दल अधिक माहितीसाठी ग्राहक त्यांच्या जवळच्या डीलरशिपशी संपर्क साधू शकतात. चला, टाटा हॅरियरचे फीचर्स, पॉवरट्रेन आणि किंमत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘या’ SUV मुळे Hyundai चे नशीब पालटले ! भारतात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या कारमध्ये समावेश
जर आपण या कारच्या पॉवरट्रेनबद्दल बोललो तर, टाटा हॅरियरमध्ये 2.0-लिटर डिझेल इंजिन आहे जे 170bhp ची कमाल पॉवर आणि 350Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. कारच्या इंजिनमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय आहे. टाटा हॅरियरच्या मॅन्युअल व्हेरिएंटमध्ये 16.80 किलोमीटर प्रति लिटर आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये 14.60 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देण्याचा कंपनीचा दावा आहे. कुटुंब सुरक्षेसाठी क्रॅश टेस्टमध्ये भारत एनसीएपीने टाटा हॅरियरला 5-स्टार रेटिंग दिले आहे.
KTM च्या ‘या’ बाईक्स मार्केटला राम राम करण्याच्या तयारीत? ऑफिशियल वेबसाइट वरून सुद्धा गायब
टाटा हॅरियरमध्ये 12.3-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंचाचा पूर्णपणे डिजिटल ड्रायव्हर आहे.
डिस्प्ले, १०-स्पीकर साउंड सिस्टम, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि पॅनोरॅमिक सनरूफ सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. याशिवाय, सुरक्षिततेसाठी, कारमध्ये मानक 6-एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि प्रगत ड्रायव्हर असिस्ट सिस्टम सारखी फीचर्स देखील आहेत. टाटा हॅरियर बाजारात महिंद्रा XUV 700 सारख्या SUV शी स्पर्धा करते. टाटा हॅरियरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत टॉप मॉडेलसाठी 15 लाख रुपयांपासून 26.50 लाख रुपयांपर्यंत आहे.