फोटो सौजन्य: @SergiusBarretto (X.com)
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये अशा अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार ऑफर करत असतात. यातीलच एक आघाडीचे नाव म्हणजे Tata Motors. टाटाने देशात विविध सेगमेंटमध्ये अनेक बेस्ट कार्स ऑफर केल्या आहेत. आता कंपनी विशेषकरून इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनावर विशेष लक्षकेंद्रीत करत आहे. पण आता कंपनीने आपल्या एका दमदार एसयूव्हीच्या किमतीत वाढ केली आहे.
भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी टाटा मोटर्स त्यांच्या कारच्या किमतीत बदल करणार आहे. कंपनीने अलीकडेच त्यांच्या एका एसयूव्हीची किंमत वाढवली आहे. कंपनीने कोणत्या एसयूव्हीची किंमत वाढवली आहे? ही एसयूव्ही किती किमतीत खरेदी करता येणार आहे? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
MG Windsor Pro Vs Tata Curvv EV: फीचर्स, बॅटरी आणि रेंजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?
टाटा मोटर्सने कूप एसयूव्ही म्हणून ऑफर झालेली Tata Curvv खरेदी करणे आता महाग झाले आहे. कंपनीने या कारच्या किमतीत 13 हजार रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत. ज्याची अंमलबजावणी देखील करण्यात आली आहे आणि वाढलेली किंमत वेबसाइटवर देखील अपडेट करण्यात आली आहे.
कंपनीने बेस व्हेरियंटच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. परंतु, त्याच्या दुसऱ्या बेस व्हेरियंटपासून किमती वाढवण्यात आल्या आहेत. Tata Curvv Pure Plus व्हेरियंट आणि स्मार्ट डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. त्याच वेळी, इतर सर्व व्हेरियंटच्या किमती 3 ते 17 हजार रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. ऑटोमॅटिक आणि सीएनजीमधील सर्व व्हेरियंटच्या किमती देखील अपडेट करण्यात आल्या आहेत.
एसयूव्हीच्या बेस व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 10 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. 1.2 -लिटर टर्बो पेट्रोल मॅन्युअलच्या इतर व्हेरियंटची किंमत 11.30 लाख ते 15 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. या एसयूव्हीच्या 1.2 -लिटर टर्बो पेट्रोल ऑटोमॅटिक व्हेरियंटची किंमत 12.67 लाख ते 16.37 लाख रुपयांच्या दरम्यान असेल, एक्स-शोरूम. 1.2 लिटर टर्बो पेट्रोल मॅन्युअल 125 पीएस व्हेरियंटची किंमत 14.20 लाख ते 17.70 लाख रुपये, 1.2 लिटर टर्बो पेट्रोल ऑटोमॅटिक 125 पीएसची एक्स-शोरूम किंमत 16.70 लाख ते 20 लाख रुपये, 1.5 लिटर टर्बो डिझेल मॅन्युअलची एक्स-शोरूम किंमत 11.50 लाख ते 17.83 लाख रुपये, 1.5 लिटर टर्बो डिझेल ऑटोमॅटिक व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 14.30 लाख ते 19.33 लाख रुपयांदरम्यान आहे.
थोडी कळ काढाच ! ‘या’ महत्वाच्या करारामुळे लक्झरी कार आणि बाईक होणार स्वस्त
Tata Curvv ही कूप एसयूव्ही म्हणून ऑफर करण्यात आली आहे. कूप एसयूव्ही सेगमेंटमध्ये ही कार सिट्रोएन बेसाल्टशी थेट स्पर्धा करते. त्याच वेळी, किमतीच्या बाबतीत, ही कार मारुती सुझुकी ग्रँड विटारा, टोयोटा हायराइडर, महिंद्रा स्कॉर्पिओ, XUV 700, स्कोडा कुशक, होंडा एलिव्हेट, ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टोस, फोक्सवॅगन टायगुन सारख्या SUV शी देखील स्पर्धा करावी लागते.