फोटो सौजन्य: Gemini
ज्याप्रमाणे भारतीय ऑटो बाजारात आपल्याला अनेक विदेशी कंपन्या दिसतात, त्याचप्रमाणे अनेक भारतीय वाहन उत्पादक कंपन्या सुद्धा विदेशात दमदार कार्स ऑफर करत असतात. यासोबतच कित्येक Made In India कार विदेशात एक्स्पोर्ट केल्या जातात. अशातच आता दोन भारतीय वाहन उत्पादक विदेशात त्यांच्या बिझनेस थाटण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. या कंपन्या म्हणजे Tata Motors आणि Mahindra.
भारताचा ऑटोमोबाईल उद्योग दक्षिण आफ्रिकेत सातत्याने वाढताना दिसत आहे. स्थानिक उत्पादन आणि निर्यात वाढवण्याच्या उद्देशाने अनेक भारतीय कंपन्या त्यांच्या सध्याच्या असेंब्ली लाईन्सचे पूर्ण क्षमतेने उत्पादन प्रकल्पांमध्ये रूपांतर करण्याची आणि तेथे नवीन कारखाने स्थापन करण्याची योजना आखत आहेत.
Toyota ने सादर केलेली बेबी Land Cruiser भारतात देखील लाँच होणार का?
अमेरिकेने लादलेल्या नवीन टॅरिफ धोरणांमुळे आणि युरोपियन युनियन (EU) कडून ICE वाहनांवर संभाव्य बंदी यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या निर्यातीच्या शक्यता कमकुवत झाल्या आहेत. या आव्हानांना तोंड देण्यासाठी, साऊथ आफ्रिका सरकार नवीन ऊर्जा वाहने (NEV) आणि इलेक्ट्रिक गतिशीलतेमध्ये गुंतवणूकीला प्राधान्य देत आहे.
दक्षिण आफ्रिकेचे व्यापार, उद्योग आणि कॉम्पिटिशन मंत्री ताऊ यांनी स्पष्ट केले की भारतीय आणि चिनी गुंतवणूकदार विद्यमान दक्षिण आफ्रिकन ऑटो कंपन्यांसोबत भागीदारीच्या संधी शोधत आहेत. ते एकतर अतिरिक्त उत्पादन क्षमता वापरण्याचा किंवा नवीन कारखाने उभारण्याचा विचार करत आहेत. सध्या सेमी-नॉक्ड डाउन (SKD) मॉडेल्सवर कार्यरत असलेल्या कंपन्या आता पूर्ण-नॉक्ड डाउन (CKD) उत्पादनाकडे जातील, म्हणजेच सर्व वाहन उत्पादन आता स्थानिक पातळीवर केले जाईल.
Hyundai Venue ची नवीन जनरेशन तुमच्यासाठी किती सुरक्षित असेल? लाँच आधीच मिळाली ‘ही’ माहिती
भारतीय ऑटो कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा यांनी त्यांच्या उत्पादन मॉडेल्सना SKD वरून CKD मध्ये अपग्रेड करण्याची पुष्टी केली आहे. स्थानिक उत्पादन क्षमता वाढवणे आणि दक्षिण आफ्रिकेचे कार एक्स्पोर्ट वाढवणे हे यामागील उद्दिष्ट आहे. महिंद्रा डर्बनमध्ये इलेक्ट्रिक वाहन (EV) असेंब्ली युनिट स्थापन करण्याची शक्यता देखील शोधत आहे, ज्याला दक्षिण आफ्रिकेच्या स्वच्छ गतिशीलता धोरणाद्वारे पाठिंबा मिळू शकेल.
टाटा मोटर्स ने 2017 मध्ये आफ्रिकेत निर्यात थांबवले होते. मात्र, आता कंपनी पुन्हा कमबॅक करत आहे. ही परती दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठी पँसेंजर व्हेईकल रिटेलर कंपनी मोटस होल्डिंग्ज लिमिटेडसोबत भागीदारीद्वारे होईल. या पार्टनरशिपमुळे टाटा मोटर्सना त्यांच्या वाहनांचे अधिक कार्यक्षमतेने वितरण करण्यास मदत होईल.






