फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्या ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर करत असतात. अशीच एक कंपनी म्हणजे टाटा मोटर्स. टाटाने देशात नेहमीच बजेट फ्रेंडली आणि प्रीमियम लूक असणाऱ्या कार लाँच केल्या आहेत.
सध्या ऑटो बाजारात इलेक्ट्रिक कार्सना मिळणारी मागणी पाहता टाटा मोटर्सने सुद्धा इलेक्ट्रिक कार ऑफर केल्या आहेत. आता कंपनीने ओणम सणानिमित्त आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. कंपनीने नव्याने लाँच झालेल्या Tata Harrier.EV वर 1 लाख रुपयांची थेट सूट दिली आहे. मात्र, ही ऑफर फक्त अशा ग्राहकांसाठी आहे जे आधीच टाटाची ईव्ही चालवत आहेत आणि आता हॅरियर.ईव्हीमध्ये अपग्रेड करू इच्छितात.
खरंतर, केरळमधील अधिकृत डीलरशिपवर एसयूव्हीची बुकिंग करता येते. हॅरियर.ईव्ही टाटाच्या नवीन Acti.EV प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आली आहे आणि त्यात 60+ केडब्ल्यूएच बॅटरी, ड्युअल मोटर ऑल-व्हील ड्राइव्ह, एडीएएस आणि व्ही२एल सपोर्ट सारख्या फीचर्सचा समावेश आहे. त्याची किंमत 27.99 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते, परंतु सवलतीनंतर ही किंमत 26.99 लाख रुपये होईल. हॅरियर.ईव्ही व्यतिरिक्त, टाटा मोटर्सने त्यांच्या संपूर्ण ईव्ही लाइनअपवर डिस्काउंट जाहीर केले आहे.
आता तरी जागे व्हा! HSRP Number Plate बसवण्याची मुदत पुन्हा वाढली, ‘ही’ असेल अंतिम तारीख
Nexon.ev ग्राहकांना 1.3 लाख रुपयांपर्यंतचे फायदे मिळतील. यामध्ये 50,000 रुपयांचा Consumer plan, 50,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 30,000 रुपयांची अतिरिक्त वॉरंटी समाविष्ट आहे.
टाटा Tiago.ev खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 85000 रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. यात कॅश डिस्काउंट, एक्स्चेंज बोनस आणि एक्स्टेण्डेड वॉरंटीचा समावेश आहे. ही कार शहरातील दैनंदिन वापरासाठी ग्राहकांची आवडती कार बनत चालली आहे.
अलीकडेच लाँच झालेल्या Punch.ev वर 10000 रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. ही एंट्री-लेव्हल ईव्ही आधीपासूनच बजेट फ्रेंडली किंमतीत उपलब्ध आहे आणि आता ओणम ऑफरमुळे ती आणखी आकर्षक ठरत आहे.
ओणमच्या ऑफर फक्त इलेक्ट्रिक वाहनांपुरत्या मर्यादित नाहीत. टाटाने त्यांच्या अनेक ICE (इंटर्नल कम्बशन इंजिन) मॉडेल्सवरही ऑफर दिल्या आहेत.
Harrier Diesel वर 1.4 लाख रुपयांपर्यंतचे फायदे
Safari Diesel वर 1.25 लाख रुपयांपर्यंतचे फायदे
Altroz (पेट्रोल/डिझेल) वर 45,000 रुपयांपर्यंतची सूट
Tigor (पेट्रोल) वर 45,000 रुपयांपर्यंतची ऑफर
Tiago (पेट्रोल) वर 35,000 रुपयांपर्यंतचे फायदे
या सर्व ऑफर निवडक व्हेरिएंटवर लागू असतील आणि त्या स्टॉकच्या उपलब्धतेवर अवलंबून असतील. तसेच, ही ऑफर तुमच्या जवळच्या शोरूमनुसार बदलू देखील शकते.