फोटो सौजन्य - Social Media
टाटा मोटर्सने भारतातील प्रीमियम प्रवासी गतीशीलतेच्या क्षेत्रात नवा टप्पा गाठत आज नवी ९-आसनी विंगर प्लस अधिकृतपणे लॉंच केली. देशातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या टाटा मोटर्सने ही नवी गाडी कर्मचारी वाहतूक तसेच वाढत्या पर्यटन आणि प्रवासी सेवांच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन केली आहे. किंमत २०.६० लाख रुपये (एक्स-शोरूम, नवी दिल्ली) असलेली विंगर प्लस प्रवाशांसाठी आराम, एैसपैस जागा आणि कनेक्टेड अनुभव देत असून ताफा ऑपरेटर्सना कमी खर्चात जास्त नफा मिळवून देणारी ठरत आहे.
या नव्या व्हेईकलमध्ये दर्जात्क वैशिष्ट्यांचा समावेश असून, त्यात रिक्लायनिंग कॅप्टन सीट्स, वैयक्तिक एसी व्हेंट्स, यूएसबी चार्जिंग पॉइंट्स आणि भरपूर लेगरूम यांचा समावेश आहे. मोठे सामान कक्ष लांब प्रवासासाठी सोयीस्कर ठरत आहे. मोनोकॉक चेसिसवर आधारित डिझाइनमुळे सुरक्षितता, स्थिरता आणि कारसारखा स्मूद ड्रायव्हिंग अनुभव मिळतो. टाटा मोटर्सचे कमर्शियल पॅसेंजर व्हेईकल विभागाचे उपाध्यक्ष आनंद एस. यांच्या मते, “विंगर प्लस प्रवाशांना प्रीमियम अनुभव देत ताफा ऑपरेटर्सना उत्कृष्ट मूल्य प्रदान करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.”
नवीन विंगर प्लसला २.२ लिटर डिकॉर डिझेल इंजिनची ताकद आहे, जे १०० एचपी पॉवर आणि २०० एनएम टॉर्क निर्माण करते. ही व्हॅन टाटा मोटर्सच्या फ्लीट एज कनेक्टेड वाहन प्लॅटफॉर्मसह उपलब्ध असून रिअल-टाइम ट्रॅकिंग, डायग्नोस्टिक्स आणि ऑप्टिमायझेशनच्या सुविधेमुळे व्यावसायिक व्यवस्थापन अधिक सक्षम होते.
विंगर प्लस ही टाटा मोटर्सच्या विविध प्रवासी वाहन पोर्टफोलिओचा एक भाग आहे, ज्यामध्ये ९ ते ५५ आसनी वेगवेगळ्या कॉन्फिगरेशन्स उपलब्ध आहेत. या श्रेणीला पूरक म्हणून ‘संपूर्ण सेवा २.०’ उपक्रमांतर्गत देखभाल करार, अस्सल स्पेअर पार्ट्स, ब्रेकडाऊन असिस्टन्स आणि वेळेत सेवा मिळण्याची खात्री दिली जाते. देशभरातील ४,५०० हून अधिक सेल्स व सर्विस टचपॉइंट्सच्या जाळ्यामुळे टाटा मोटर्स विश्वसनीय, कार्यक्षम आणि भविष्याभिमुख प्रवासी गतीशीलतेची हमी देत आहे. ही नवी विंगर प्लस कर्मचारी वाहतूक व पर्यटन क्षेत्रात प्रीमियम अनुभव आणि उंचावलेली कार्यक्षमता देत व्यावसायिक प्रवासी वाहन क्षेत्रात नवीन मापदंड निर्माण करेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.