फोटो सौजन्य: @MotorOctane/X.com
टाटा मोटर्सने आतापर्यंत अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. टाटा पंच ही कंपनीची एक लोकप्रिय कार आहे. जर तुम्ही ही कार EMI वर खरेदी केली तर तुम्हाला किती वर्ष EMI भरावा लागेल त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
भारतीय ऑटो बाजारात कार खरेदीदार नेहमीच अशा एका कारच्या शोधात असतात, जी त्यांना बजेट फ्रेंडली किमतीत उत्तम परफॉर्मन्स देईल. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेत, अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये चांगल्या कार ऑफर करत असतात. यातही टाटा मोटर्सने ग्राहकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले आहे.
देशात Tata Motors ने विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या आहेत. अशीच एक लोकप्रिय कार म्हणजे टाटा पंच. टाटा पंच ही भारतात सर्वाधिक विक्री होणारी कार मानली जाते, जी बजेट-फ्रेंडली देखील म्हणता येईल कारण याची किंमत 7 लाख रुपयांच्या आत आहे. जर तुमचा पगार 40 ते 45 हजार रुपये असेल तर तुम्ही टाटा पंच सहज खरेदी करू शकता. कसे? चला याबद्दल जाणून घेऊयात.
एथर कम्युनिटी डे निमित्ताने एथर एनर्जीने केले ईएल स्कूटर प्लॅटफॉर्मचे अनावरण
ही कार खरेदी करण्यासाठी एकाच वेळी पूर्ण पैसे देणे आवश्यक नाही, तुम्ही लोन घेऊन देखील ही कार खरेदी करू शकता. यानंतर, तुम्हाला ती दरमहा EMIच्या स्वरूपात बँकेत जमा करावी लागेल.
टाटा पंचच्या Pure Petrol व्हेरिएंटची दिल्लीतील ऑन-रोड किंमत 6.66 लाख आहे. जर तुम्ही 50,000 चे डाउन पेमेंट केली, तर आपल्याला बँकेकडून 6.12 लाखांचे कर्ज घ्यावे लागेल. कार लोनची रक्कम तुमच्या Credit Score किती चांगला आहे यावर अवलंबून असते.
टाटा पंच खरेदीसाठी जर बँक 9% व्याजदर आकारत असेल आणि हे लोन आपण 4 वर्षांसाठी घेतले, तर दर महिन्याला 15,253 चा EMI भरावा लागेल. पण हेच लोन जर तुम्ही 5 वर्षांसाठी घेतले, तर 9% व्याजदरावर दर महिन्याला सुमारे 12,708 रुपयांचा हप्ता म्हणून भरावा लागेल.
Renault ची ‘ही’ अफलातून कार फक्त 2 लाखात आणा घरी! असा असेल EMI चा संपूर्ण हिशोब
जर टाटा पंच खरेदी करण्यासाठी तुम्ही सहा वर्षांचं कर्ज घेतलं असेल, तर दरमहा 11,035 रुपयांचा EMI बँकेत जमा करावा लागेल. जर पंच खरेदी करण्यासाठी सात वर्षांचे कर्ज घेतले असेल, तर दरमहा 9,850 रुपयांचा ईएमआय बँकेत जमा करावा लागेल.
देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये टाटा पंचच्या किमतीत काही फरक दिसू शकतो. यासोबतच, पंचवर उपलब्ध असलेल्या कर्जाची रक्कम देखील वेगळी असू शकते. जर कार लोनवरील व्याजदरात फरक असेल, तर EMIच्या आकड्यांमध्येही फरक जाणवू शकतो. लक्षात घ्या, कार लोन घेण्यापूर्वी सर्व प्रकारची माहिती घेणे महत्त्वाचे आहे.