फोटो सौजन्य - Social Media
ऑटोमोबाईल क्षेत्रात वॉक्सवॅगन या कंपनीने फार मोठे नाव केले आहे. देशातही ही कंपनी फार प्रचलित आहे. पण मात्र या कंपनीची गेल्या महिन्यातील कामगिरी पाहता अतिशय बिकट अवस्था दिसून येत आहे. चला या वॉक्सवॅगनचा गेल्या महिन्यातील परफॉर्मन्स पाहून घेऊ. वॉक्सवॅगन वटर्स अँड tiguan ला २०२५ मध्ये १,५०० ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला आहे. पण यातील tiguan च्या हाती केवळ निराशा आली आहे. वॉक्सवॅगन tiguan ला जानेवारी २०२५ मध्ये केवळ एक ग्राहक प्राप्त झाला आहे. फक्त एका ग्राहकाने या SUV ची खरेदी केली आहे. टक्केवारी पाहता वॉक्सवॅगन tiguanच्या विक्रीत ९९.12% घसरण दिसून आली आहे. वॉक्सवॅगन tiguan चा गेल्या वर्षातील जानेवारीचा परफॉर्मन्स पाहता, त्यावेऑटोमोबाईल क्षेत्रात वॉक्सवॅगन कंपनीची कमालीची पकड आहे. पण हा ताबा कुठेतरी फिकट पडताना दिसत आहे. वॉक्सवॅगन tiguanचा गेल्या महिन्यातील परफॉर्मनास पाहता केवळ एकाच ग्राहकाने या SUVची खरेदी केली आहे.
ळी ११३ ग्राहकांनी वॉक्सवॅगन tiguanला पसंती दर्शवली होती.
वॉक्सवॅगन Tiguan च्या पावरट्रेनच्या बाबतीत पाहिले गेले, तर ही SUV दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते. यात २.० लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे उच्च कार्यक्षमतेसह उत्तम ड्रायव्हिंग अनुभव देते. हे इंजिन अधिकतम 190BHP आणि 320NM पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे, त्यामुळे SUV ला वेगवान प्रवास आणि उत्कृष्ट एक्सीलरेशन मिळते.
याशिवाय, Tiguan ला ७-स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्स (DSG) जोडण्यात आले आहे, जो स्मूथ आणि जलद गिअरशिफ्टिंग अनुभव प्रदान करतो. हा ट्रान्समिशन सिस्टम केवळ कार्यक्षमतेतच उत्तम नाही, तर इंधन कार्यक्षमतेतही मदत करतो, ज्यामुळे SUV ला चांगला मायलेज मिळतो. तसेच, गाडीला 4MOTION ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) तंत्रज्ञान देखील देण्यात आले आहे, जे वेगवेगळ्या रस्त्यांच्या परिस्थितीत उत्तम ट्रॅक्शन आणि स्थिरता प्रदान करते. त्यामुळे Tiguan ही केवळ शहरातच नाही, तर ऑफ-रोडिंग आणि लॉन्ग ड्राइव्हसाठीही एक उत्तम पर्याय ठरते.
धमाकेदार फीचर्सने सुसज्ज एसयूवी
या एसयूवीमध्ये ग्राहकांना 8-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॅनोरमिक सनरूफ, क्लायमेट कंट्रोल आणि 30 रंगांच्या Ambient lighting यांसारखे शानदार फीचर्स मिळतात. याशिवाय, सुरक्षेसाठी 6-एअरबॅग, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल यांसारखी अत्याधुनिक वैशिष्ट्ये देखील देण्यात आली आहेत.
या कार्सशी होते स्पर्धा
भारतीय बाजारात फॉक्सवैगन टिगुआन ची टक्कर स्कोडा कोडियाक, टोयोटा फॉर्च्यूनर, एमजी ग्लोस्टर, किया स्पोर्टेज आणि ह्युंदाई टक्सन यांसारख्या लोकप्रिय एसयूव्हींशी होते. या एसयूवीची एक्स-शोरूम किंमत 35.17 लाख रुपये आहे.