फोटो सौजन्य: Social Media
देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत झपाट्याने वाढत होत आहे. वाढत्या इंधनाच्या किंमतीमुळे अनेक ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना जास्त प्राधान्य देत आहे. हीच वाढती मागणी पाहता, अनेक ऑटो कंपन्या ज्या पूर्वी फक्त इंधनावर चालणाऱ्या कार बनवत होत्या, त्याच आता इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनावर विशेष लक्षकेंद्रित करत आहे.
काही महिन्यांपूर्वीच देशातील एसयूव्ही उत्पादक कंपनी, महिंद्राने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये दमदार इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच केल्या होत्या. Mahindra BE6 आणि Mahindra XEV 9e असे या नवीन इलेक्ट्रिक कारचे नाव आहे.
कंपनीने आजपासून या दोन नवीन एसयूव्हीसाठी बुकिंग सुरू केली आहे. यामध्ये महिंद्रा BE6 आणि XEV 9e यांचा समावेश आहे. या दोन्ही कार किती रुपयांना बुक करता येईल? त्यांची डिलिव्हरी कधी सुरू होईल? या कारची किंमत किती? या प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेऊया.
Honda कडून ‘ही’ नवीन बाईक मार्केटमध्ये लाँच, स्पोर्ट लूक असून देखील किंमत अगदी मापक
महिंद्राने काही काळापूर्वी लाँच केलेल्या नवीन जनरेशनच्या SUV Mahindra BE6 आणि Mahindra XEV 9e चे बुकिंग आजपासून (14 फेब्रुवारी)सुरू झाले आहे. या दोन्ही इलेक्ट्रिक एसयूव्हीसाठी बुकिंग डीलरशिपद्वारे ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने करता येईल.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 14 फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून बुकिंग सुरू करण्यात आले आहे.
महिंद्राने दिलेल्या माहितीनुसार, टॉप व्हेरियंट म्हणून ऑफर केलेल्या पॅक थ्रीची डिलिव्हरी मार्च 2025 पासून सुरू होईल. पॅक टू आणि Pack Three ची सिलेक्टची डिलिव्हरी जून आणि जुलै २०२५ मध्ये सुरू होईल. यानंतर Pack Two ची डिलिव्हरी सुरू होईल. महिंद्रा BE 6 आणि XEV 9e चे बेस व्हेरियंट म्हणून देण्यात येणाऱ्या पॅक वन आणि Pack One Above ची डिलिव्हरी ऑगस्ट 2025 पासून सुरू होईल.
होंडाकडून नवीन 2025 Honda Shine 125 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
महिंद्राने BE6 पाच व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक कारची एक्स-शोरूम किंमत 18.90 लाख रुपयांपासून सुरू होते आणि त्याचे टॉप व्हेरियंट 26.90 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत आणला जात आहे.
महिंद्रा XEV 9e ची किंमत 21.90 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि त्याचे टॉप व्हेरियंट 30.50 लाख रुपये किमतीत उपलब्ध आहे. ही कार चार व्हेरियंटमध्ये सादर केले जात आहे.
महिंद्राच्या BE6 आणि XEV 9e या इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये आणल्या गेल्या आहेत. या कार Tata Curvv EV, MG Windsor EV, Hyundai Creta EV, MG ZS EV, BYD Atto3 सारख्या SUV सोबत तसेच लवकरच लाँच होणाऱ्या Maruti E Vitara, Tata Harrier EV सोबत स्पर्धा करेल.