इलेक्ट्रिक वाहनांना टोलमुक्ती, राज्य सरकारकडून नवं ईव्ही धोरण मंजूर
महाराष्ट्रात आता इलेक्ट्रिक वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींना कंटाळून ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीस जास्त प्राधान्य देत आहे. त्यामुळेच अनेक ऑटो कंपन्या आता इलेक्ट्रिक टू व्हिलर्स आणि कार्स उत्पादित करत आहे. त्यात आता महाराष्ट्रात BYD सारख्या विदेशी इलेक्ट्रिक ऑटो कंपनी देखील आपल्या कार्स ऑफर करत आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रात Tesla ची कार देखील स्पॉट करण्यात आली आहे. आज नुकतेच एक बैठक झाली, ज्यात EV धोरणाला राज्य सरकारकडून मान्यता मिळाली आहे.
भारतीयांना सहज परवडणारी कार पाकिस्तानी लोकांच्या बजेट बाहेर, किंमत एकदा वाचाच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. यावेळी सरकारने नवीन इलेक्ट्रिक व्हेइकल धोरणास मंजुरी दिली आहे. या धोरणांतर्गत काही विशिष्ट इलेक्ट्रिक गाड्यांना काही निवडक रस्त्यांवर टोलमुक्ती दिली जाणार आहे. तसेच प्रवासी इलेक्ट्रिक गाड्यांवर मोठं अनुदान दिलं जाणार आहे.
महाराष्ट्राच्या नव्या इलेक्ट्रिक वाहन धोरणानुसार, आता राज्यात ईव्ही खरेदी करताना ग्राहकांना 10 टक्के सवलत मिळणार आहे. यासाठी राज्य सरकारने धोरणात विशेष तरतूद केली आहे.
‘ही’ ऑटो कंपनी काय ऐकत नाही ! फक्त 5 वर्षात 15 लाख कार बनवत गाजवलंय मार्केट
जर तुम्ही इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याच्या विचारत असाल तर मग तुम्हाला 100 टक्के लोन सुविधा मिळणार आहे. विशेष म्हणजे जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक वाहन असेल, तर महाराष्ट्रातील काही रस्त्यांवर तुम्हाला टोल भरण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्राच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणानुसार, ईव्ही वाहनांना टोलमधून संपूर्ण सूट देण्यात आली आहे. मात्र, यासाठी काही अटी लागू असून, ही सूट निवडक रस्त्यांपुरती मर्यादित असेल. त्यामुळे ज्या मार्गांवर ही सवलत लागू आहे, तिथे ईव्ही वाहनांसाठी एक रुपयाचाही टोल भरावा लागणार नाही.