फोटो सौजन्य: Pinterest
मारुती सुझुकीची नवीन हायब्रिड एसयूव्ही, व्हिक्टोरिस, भारतीय बाजारपेठेत लोकप्रिय ठरत आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये, 12,300 हून अधिक ग्राहकांनी ही एसयूव्ही खरेदी केली, ज्यामुळे ती हायब्रिड विभागातील सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही बनली. उत्कृष्ट मायलेज, विश्वासार्ह तंत्रज्ञान आणि परवडणाऱ्या किमतीसह, व्हिक्टोरिसने Maruti Grand Vitara आणि Toyota Hyryder सारख्या लोकप्रिय एसयूव्हींना मागे टाकले आहे.
Mahindra XUV 7XO ची बुकिंग उद्यापासून सुरु, जाणून घ्या SUV मधील खास वैशिष्ट्य
मारुती सुझुकी व्हिक्टोरिसची एक्स-शोरूम किंमत 10.49 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंटसाठी 19.99 लाख रुपयांपर्यंत जाते. राजधानी दिल्लीमध्ये याच्या बेस मॉडेलची ऑन-रोड किंमत सुमारे 12 लाख रुपये आहे. या किमतीत हायब्रिड तंत्रज्ञानामुळे ती भारतातील सर्वात परवडणारी हायब्रिड एसयूव्ही बनते, ज्यामुळे ती मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक चांगला ऑप्शन आहे.
व्हिक्टोरिसमध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन आहे ज्यामध्ये माईल्ड हायब्रिड टेक्नॉलॉजी आहे, जी 102 बीएचपी निर्माण करते. मजबूत हायब्रिड आणि सीएनजी पर्याय देखील उपलब्ध आहेत. ही एसयूव्ही मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे. ज्यामुळे शहरात आणि महामार्गावर ड्रायव्हिंगचा अनुभव सुरळीत आहे. एडब्ल्यूडी पर्यायामुळे ही एसयूव्ही माईल्ड ऑफ-रोड रस्त्यांवर देखील उत्तमप्रकारे चालू शकते.
3 लाखांचे डाउन पेमेंट आणि भारतातील सर्वाधिक लोकप्रिय EV तुमच्या दारात उभी, ‘असा’ असेल संपूर्ण हिशोब
Maruti Victoris ही आपल्या सेगमेंटमधील सर्वाधिक मायलेज देणारी एसयूव्ही मानली जाते. पेट्रोल व्हेरिएंटमध्ये ही कार सुमारे 21 किमी प्रति लिटर मायलेज देते. तर हायब्रिड व्हेरिएंटमध्ये कंपनीकडून तब्बल 28.65 किमी प्रति लिटर मायलेजचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय, CNG मॉडेलही अंदाजे 26 किमी प्रति किलो मायलेज देण्यास सक्षम असून, त्यामुळे ही कार अत्यंत किफायतशीर ठरते.
Victoris मध्ये मोठा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस चार्जिंग, 360 डिग्री कॅमेरा आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीसारखी अत्याधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने यात 6 एअरबॅग्स आणि लेव्हल-2 ADAS टेक्नॉलॉजीचा समावेश आहे. Bharat NCAP कडून मिळालेली 5-स्टार सेफ्टी रेटिंग ही कार कुटुंबासाठी अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय बनवते.






