Triumph च्या 'या' 2 बाईक झाल्या स्वस्त
भारतीय बाजारात विविध सेगमेंटच्या बाईकला चांगली मिळत आहे. यातही जीएसटी कमी झाल्याने बाईकच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. मात्र, ही कपात 350 cc सेगमेंटपर्यंतच्या बाईकसाठीच आहे. मात्र, अनेक कंपन्या आहेत ज्यांनी 350 सीसी पेक्षा जास्त क्षमता असणाऱ्या बाइकच्या किमतीत घट केली आहे.
Triumph मोटारसायकल्स आणि Bajaj ऑटोने त्यांच्या लोकप्रिय स्पीड रेंज, Speed 400 आणि Speed T4 च्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी लाँच झालेल्या या दोन्ही बाईक्सच्या किमतींपेक्षा या नवीन किमती खूपच कमी आहेत. या दोन्ही पॉवरफुल बाईकच्या किमती 16,797 रुपयांपर्यंत कमी करण्यात आल्या आहेत.
Toyota Kirloskar Motor च्या वाहनांना ग्राहकाचा कसा प्रतिसाद? सप्टेंबर 2025 मध्ये किती वाहनं विकली?
Triumph Speed 400 आणि Speed T4 यांच्या किंमतींमध्ये 16,797 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. Speed 400 ची एक्स-शोरूम किंमत पूर्वी 2.50 लाख रुपये होती, जी आता कमी होऊन 2.33 लाख रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे Speed T4 ची एक्स-शोरूम किंमत पूर्वी 2.06 लाख रुपये होती, जी आता घटून 1.92 लाख रुपये झाली आहे.
एका बाजूला सरकारने GST दरांमध्ये वाढ केली होती, तर दुसऱ्या बाजूला Triumph आणि Bajaj Auto यांनी स्वतःहून बाइकवरील टॅक्स कमी केला आहे. इतकंच नव्हे तर, जर फक्त GST चा प्रभाव ॲडजस्ट केला असता, तर Speed 400 ची किंमत 2.55 लाख रुपयांपासून 2.60 लाख रुपयांपर्यंत पोहोचली असती. पण Triumph ने त्यांची बाईक आणखी परवडणारी करत ग्राहकांना सुमारे 25,000 रुपयांचा थेट फायदा दिला.
‘या’ बाईक्स बनतील तुमच्या हमसफर! किंमत फक्त 55 हजारांपासून सुरु…
स्पीड रेंजच्या यशामुळे, ट्रायम्फचे हे पाऊल भारतीय बाजारपेठेत आपले स्थान आणखी मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. बजाज ऑटोचे प्रोबायकिंग प्रमुख माणिक नांगिया म्हणाले, “स्पीड 400 आणि स्पीड T4 ने परफॉर्मन्स, डिझाइन आणि सुलभतेच्या बाबतीत नवीन बेंचमार्क स्थापित केले आहेत. हे पाऊल ट्रायम्फ आणि बजाज यांच्या भारतीय बाजारपेठेतील ग्राहकांशी असलेल्या मजबूत आणि स्थिर संबंधांचे प्रतीक आहे.”