मुंबई : सिट्रोन (Citroen) आता आपल्या नवीन सी ३(C3) या दुसऱ्या कारसह भारतात आपल्या पोर्टफोलिओ विस्तारासाठी सज्ज आहे. या नवीन बी-सेगमेंट हॅचबॅक (B-segment hatchback) मध्ये ९०% पेक्षा जास्त लोकलायझेशन असून हे खास भारतीय ऑटोमोटिव्ह मार्केटच्या विशीष्ट गरजांसाठी डिझाइन केलेले आहे.
ही कार अनोखी डिझाइन, सर्वोत्तम-इन-क्लास आराम आणि राइड क्लालिटीने परिपूर्ण आहे. ग्राहक १ जुलै २०२२ पासून देशभरातील सिट्रोनच्या ला मेसन शोरूममध्ये किंवा सिट्रोन इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवरून या नवीन सी थ्री (C3) ची प्री-ऑर्डर करू शकतील.
ला मेसन सिट्रोनच्या लाँच विषयी बोलताना, सौरभ वत्सा, ब्रँड हेड, सिट्रोन इंडिया, म्हणतात, “आम्ही मुंबई तील ग्राहकांसाठी नवीन सी थ्री (C3) चे अनावरण करण्यास उत्सुक आहोत. हे नवीन मॉडेल बी-सेगमेंटमध्ये सादर केले जात आहे, जे भारतात अत्यंत स्पर्धात्मक आहे.
या विभागात वेगळ्या पद्धत्तीची आणि महत्त्वाकांक्षी कार तयार करणे आमच्यासाठी महत्त्वाचे होते. नवीन सी थ्री (C3) मध्ये सिट्रोन ॲडव्हान्स कम्फर्ट प्रोग्राम असेल. एक्सप्रेस युअर स्टाईल या अनोख्या कस्टमायझेशन धोरणासह, ग्राहकांना ३ मूड पॅक, ५६ कस्टमायझेशनचे पर्याय आणि ७० हुन अधिक ॲक्सेसरीजमधून निवड करण्याची संधी मिळेल.
नवीन सी थ्री (C3) ने सिट्रोनच्या एका नव्या अध्यायाची सुरुवात केली आहे, मॉडेल्स निर्मिती ही ब्रँडच्या धोरणाशी सुसंगत असेल. भारतीय बाजाराच्या विशिष्ट गरजांनुसार लोकट टिम सोबत काळजीपूर्वक संशोधन केरून हे मॉडेल विकसित केले आहे. नवीन सी थ्री (C3) २०१९ मध्ये लाँच करण्यात आलेल्या “सी क्यूब्ड” प्रोग्रॅमचे पहिले मॉडेल आहे, २०२४ पर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर थ्री व्हिलर लॉन्च करण्याची योजना देखील आहे. यात स्पर्धात्मकता, मार्केट लिडिंग ऑफर, अनोखी स्टाईल, ऑन-बोर्ड कम्फर्ट डिझाइनचा अनुभव आणि इच्छित देशांच्या विशिष्ट गरजांनुसार तयार केलेल्या डिझाइनचा फायदा दिसुन येइल.
निश्चित डिझाईन सह, नवीन सी थ्री (C3) ग्राहकांना निश्चीतच आकर्षित करेल. ज्यांच्यासाठी कार ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब आहे, ते आपल्या आवडीनुसार कार कस्टमाईज करू शकतील. यासाठी भारतीय बाजारपेठेकडून मोठी अपेक्षा आहे. याशिवाय यात दिसुन येईल कॉम्पॅक्टनेस सब ४ एम (4m) आकार, वेग, वेगळेपणा, ऑन-बोर्ड स्पेस, आरामदायी आणि भारतीय रस्त्यांप्रमाणे सुधार, कस्टमायझेशन, आपल्या आवडीनुसार जीवनशैलीनुसर निवडीचा पर्याय,नवीन सी थ्री हाई व्हिज्युअल अपील, वेगळी स्टाइल , ९० % पेक्षा जास्त स्थानिकीकरण, व्यावहारिक स्पर्धात्मक किंमत.
नवीन सिट्रोन सी थ्री २० जुलै २०२२ रोजी भारतात लाँच होईल आणि ही ला मेसनच्या शोरूममध्ये आणि सिट्रोनच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाईन किरकोळ विक्रीसाठी उपलब्ध असेल.
शोरूमचा पत्ता – ला मॅशन सिट्रोन मुंबई – पीपीएस मोटर्स, कृष्णा परिसर सहकारी संस्था, प्लॉट नं.डी-6 सीटीएस नं.633, न्यू लिंक आरडी, समोर. लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट, अंधेरी वेस्ट, मुंबई, महाराष्ट्र ४०००५३






