फोटो सौजन्य: iStock
भारतातील आघाडीचे ऑटोमोबाईल ब्रँड्स सतत नवनवीन कार्स सादर करत असतात. विशेषतः कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्ये ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता आगामी काळात अनेक नवी मॉडेल्स लाँच होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुढील काही महिन्यांमध्ये टाटा, मारुती, ह्युंदाई आणि किया यांसारख्या कंपन्यांकडून कॉम्पॅक्ट SUV आणि हॅचबॅक प्रकारातील नवीन कार्स बाजारात येऊ शकतात. या नव्या मॉडेल्समध्ये आधुनिक तंत्रज्ञान, उत्तम मायलेज आणि आकर्षक डिझाईन यांचा समावेश असेल. त्यामुळे नवीन कार घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी पुढील काळात अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत.
टाटा मोटर्स लवकरच अल्ट्रोज फेसलिफ्ट व्हर्जन लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनी येत्या 22 मे 2025 रोजी ही प्रीमियम हॅचबॅक सेगमेंट कार औपचारिकपणे लाँच करेल. जुन्या व्हर्जनच्या तुलनेत, यात नवीन बंपर, हेडलाइट्स, टेल लाईट्स आणि अनेक नवीन फीचर्स दिले जातील.
2025 Yezdi Adventure भारतात लवकरच होणार लाँच, नव्या फीचर्ससह मिळणार नवीन डिझाइन
रिपोर्ट्सनुसार, महिंद्रा पुढील काही महिन्यांत त्यांच्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही XUV 3XO चे EV व्हर्जन देखील सादर करू शकते. त्याच्या इलेक्ट्रिक व्हर्जनची डिझाइन ICE व्हेरियंट सारखेच ठेवता येते, परंतु EV व्हर्जनमध्ये काही किरकोळ बदल केले जाऊ शकतात. डिझाइनमध्ये थोडे बदल करून, एका चार्जमध्ये 400 ते 500 किलोमीटरची रेंज देखील दिली जाऊ शकते. तसेच त्यात अनेक नवीन फीचर्स देखील जोडले जाऊ शकतात.
पुढील काही महिन्यात मारुती सुझुकी फ्रँक्स हायब्रिड लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीकडून अद्याप याबद्दल कोणतीही औपचारिक माहिती देण्यात आलेली नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या त्याची टेस्टिंग सुरू आहे. एसयूव्हीच्या हायब्रिड व्हर्जनमध्ये नवीन 1.2 -लिटर झेड सिरीज इंजिन देखील असेल.
2025 Yamaha Tracer 7 सिरीज लाँच, डिझाइन आणि फीचर्समध्ये झाले मोठे बदल
दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी ह्युंदाई व्हेन्यूला कॉम्पॅक्ट एसयूव्ही म्हणून देखील ऑफर केले गेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या एसयूव्हीचे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच करण्याची तयारी सुरू आहे. ज्यामध्ये डिझाइनमध्ये अनेक मोठे बदल केले जातील. तसेच, त्यात अनेक नवीन फीचर्स दिले जातील. ज्यामुळे ही एसयूव्ही तिच्या सेगमेंटमधील इतर एसयूव्हींना थेट आव्हान देऊ शकेल. वर्षाच्या अखेरीस ह्युंदाई व्हेन्यू फेसलिफ्ट लाँच होण्याची अपेक्षा आहे.