फोटो सौजन्य: www.yezdi.com
भारतात आता मोठ्या प्रमाणात बाईक्सची विक्री केली जाते. यात विविध सेगमेंटमध्ये बाईक ऑफर केल्या जातात. सध्या अॅडव्हेंचर बाईकची क्रेझ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. भारतात अनेक उत्तम दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट अॅडव्हेंचर बाईक ऑफर करत असतात. Classic Legends ही त्यातीलच एक कंपनी.
क्लासिक लेजेंड्स लवकरच भारतीय बाजारात 2025 Yezdi Adventure लाँच करणार आहे. ही बाईक आधी 15 मे 2025 रोजी लाँच होणार होती, परंतु भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावामुळे कंपनीने त्याची लाँच डेट पुढे ढकलली आहे. त्याची नवीन लाँच डेट अद्याप जाहीर केलेली नाही. परंतु, ती जूनमध्ये लाँच होण्याची अपेक्षा आहे. 2025 च्या क्लासिक लेजेंड्स Yezdi Adventure मध्ये कोणत्या नवीन गोष्टी पाहायला मिळतील, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
2025 Yamaha Tracer 7 सिरीज लाँच, डिझाइन आणि फीचर्समध्ये झाले मोठे बदल
2025 च्या Yezdi Adventure मध्ये डिझाइनमध्ये अनेक मोठे बदल होऊ शकतात. नवीन हेडलाइट, टेललाइट आणि सीटमध्येही बरेच बदल दिसून येतात. इतकेच नाही तर नवीन Yezdi Adventure ला नवीन कलरस्कीम देखील दिली जाऊ शकते, ज्यामध्ये नवीन ग्राफिक्स देखील असण्याची अपेक्षा आहे.
2025 च्या येझदी अॅडव्हेंचरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि यूएसबी टाइप-सी चार्ज पोर्टसह एलसीडी इन्स्ट्रुमेंट कन्सोल सारखी फीचर्स पूर्वीप्रमाणेच कायम राहण्याची शक्यता आहे. यात तीन ABS मोड्स देखील आहेत – रोड, रेन आणि ऑफ-रोड. नवीन अॅडव्हेंचरमध्ये अनेक उत्तम फीचर्स पाहायला मिळतील, ज्यामुळे ड्रायव्हिंगचा अनुभव आणखी चांगला होईल.
2025 Yezdi Adventure मध्ये त्याच 334 सीसी, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिनचा वापर केला जाऊ शकतो, जो 29.6 पीएस पॉवर आणि 29.8 एनएम टॉर्क जनरेट करेल. त्याचे इंजिन सहा-स्पीड गिअरबॉक्सशी जोडले जाईल. याचे इंजिन लेटेस्ट OBD-2B उत्सर्जन नियमांचे पालन करण्यासाठी अपडेट केले जाऊ शकते. त्याच्या इंजिन ट्यूनमध्ये थोडे बदल करून त्यात सुधारणा अपेक्षित आहे.
परफेक्ट Electric Cars च्या शोधात आहात? ‘या’ ऑप्शनचा नक्की विचार करा, किंमत 10 लाखांपेक्षा कमी
नुकत्याच लाँच झालेल्या Yezdi Adventure ची एक्स-शोरूम किंमत 2,09,900 ते 2,19,900 रुपयांदरम्यान आहे. नवीन अपडेट मिळाल्यानंतर, त्याच्या किमतीत थोडी वाढ होऊ शकते. भारतीय मार्केटमध्ये, ही बाईक XPulse 210, KTM 250 Adventure, Suzuki V-Strom SX 250 आणि आगामी TVS Apache RTX 300 सारख्या इतर अॅडव्हेंचर बाईक्सशी स्पर्धा करते.