फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटोमोबाईल मार्केट हे व्यवसायासाठी उत्तम ठिकाण असल्याकारणाने इथे नेहमीच विदेशातील ऑटो कंपन्या भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बेस्ट कार ऑफर करत असतात. एवढेच नव्हे तर दमदार ऑफर्स देखील दिल्या जातात. अशीच एक ऑफर Renault कंपनी आपल्या कार्सवर देत आहेत. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
भारतीय ऑटो बाजारात हॅचबॅकपासून एसयूव्ही सेगमेंटपर्यंतच्या वाहनांची विक्री करणाऱ्या आघाडीच्या फ्रेंच ऑटोमोबाईल कंपनी रेनॉल्टकडून आकर्षक डिस्काउंट ऑफर दिल्या जातात. मे 2025 मध्ये कोणत्या वाहनावर कोणती ऑफर मिळत आहे त्याबद्दल जाणून घेऊयात.
Kia Carens Clavis भारतात लाँच, अनेक दमदार फीचर्सने सुसज्ज असणार कार
हॅचबॅक सेगमेंटमध्ये रेनॉल्ट क्विड ऑफर केली जाते. जर तुम्ही मे महिन्यात ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या महिन्यात Renault Kwid वर जास्तीत जास्त 25 हजार रुपयांची बचत करता येणार आहे. यावर 10 हजार रुपयांचे कॅश डिस्काउंट आणि 15 हजार रुपयांचे एक्सचेंज बोनस दिला जात आहे. ही ऑफर RXE आणि RXL(O) व्यतिरिक्त अन्य व्हेरियंट्सवर उपलब्ध आहे. याशिवाय, तुम्हाला RXL(O) वर 3000 रुपयांचे रेफरल बोनस मिळू शकते. तसेच स्क्रॅपेज प्रोग्राम ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. या हॅचबॅक कारची एक्स-शोरूम किंमत 4.69 लाख ते 6.45 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. 2024 चे उर्वरित युनिट्स खरेदी करून, या महिन्यात तुम्ही 90 हजार रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स मिळवू शकता.
कंपनीकडून बजेट फ्रेंडली एमपीव्ही म्हणून रेनॉल्ट ट्रायबर ऑफर केली जाते. जर तुम्ही ही कार मे 2025 मध्ये खरेदी केली तर तुमची 50 हजार रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. या कारच्या RXE आणि RXL व्हेरियंटव्यतिरिक्त ही बचत दिली जात आहे. ज्यामध्ये 25 हजार रुपयांचे कॅश डिस्कॉऊंट आणि 25 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. या बजेट एमपीव्हीची किंमत 6.14 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरियंटची किंमत 8.98 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते. या कारचे 2024 चे उर्वरित युनिट्स खरेदी करून, तुम्ही या महिन्यात 90 हजार रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स मिळवू शकता.
Operation Sindoor नंतर जर भारत-पाकिस्तानात युद्ध झालेच तर लष्करासाठी खूप फायद्याची ठरेल ‘ही’ कार
रेनॉल्टकडून सब फोर मीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये किगर ऑफर केली जाते. जर तुम्ही ही कार मे 2025 मध्ये खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही त्यावर 50 हजार रुपयांपर्यंत बचत करू शकता. ज्यामध्ये २५,००० रुपये कॅश डिस्काउंट आणि 25000 रुपये एक्सचेंज बोनस म्हणून देण्यात येत आहे. रेनॉल्ट किगर एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 6.14 लाख रुपयांपासून सुरू होते आणि तिच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 11.23 लाख रुपये आहे.