फोटो सौजन्य: @sidpatankar/X.com
भारतीय बाजारात अनेक ऑटो कंपन्या आहेत. ज्या बेस्ट कार ऑफर करत असतात. यातही काही कंपन्या अशा आहेत, ज्यांच्या फक्त नावानेच कार्सची विक्री होत असते. अशीच एक कंपनी म्हणजे टाटा मोटर्स. कंपनीने आतापर्यंत ग्राहकांच्या अपेक्षेनुसार बेस्ट कार ऑफर केल्या आहेत. म्हणूनच तर आजही ग्राहक नवी कार खरेदी करताना टाटा मोटर्सच्या कारला पहिले प्राधान्य देत असतात. सध्या कंपनी इलेक्ट्रिक कारच्या उत्पादकडे विशेष लक्ष देत आहे.
भारतातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सकडून इलेक्ट्रिक कार आणि एसयूव्ही विकल्या जातात. Tata Curvv EV ही इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये कूप एसयूव्ही म्हणून विकली जाते. जर तुम्ही त्याचा बेस व्हेरिएंट Creative 45 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 3 लाख रुपयांचे डाउन पेमेंट दिल्यानंतर तुम्हाला दरमहा किती EMI भरावा लागेल.त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
ग्राहकांची आवडती Tata Punch खरेदी करण्यासाठी किती वर्ष भरावा लागेल EMI?
टाटा मोटर्सने कर्व्ह ईव्हीचा बेस व्हेरिएंट म्हणून Creative 45 ऑफर केले आहे. कंपनीने या वाहनाचा बेस व्हेरिएंट 17.49 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहे. जर ही कार दिल्लीमध्ये खरेदी केली तर 17.49 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीसह त्यावर रजिस्ट्रेशन आणि विमा देखील भरावा लागेल. ही कार खरेदी करण्यासाठी सुमारे 7 हजार रुपये रजिस्ट्रेशन टॅक्स आणि सुमारे 73 हजार रुपये विम्यासाठी भरावे लागतील. याशिवाय, टीसीएस शुल्क म्हणून 17490 रुपये देखील भरावे लागतील. त्यानंतर दिल्लीमध्ये वाहनाची ऑन-रोड किंमत 18.47 लाख रुपये होईल.
Hyundai च्या नवीन इलेक्ट्रिक कारची पहिली झलक आली समोर, कधी होणार लाँच?
जर तुम्ही Tata Curvv EV चा Creative 45 variant खरेदी केला, तर बँक ही कारची एक्स शोरूम किंमत फायनान्स करेल. अशा वेळी तुम्ही 3 लाख रुपये Down Payment केल्यानंतर सुमारे 15.47 लाख रक्कम बँकेतून फायनान्स करावी लागेल. जर बँक तुम्हाला 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी ₹15.47 लाखांचे loan देते, तर दर महिन्याला तुम्हाला फक्त 24,889 EMI द्यावा लागेल.
जर तुम्ही 9% interest rate वर 7 वर्षांसाठी ₹15.47 लाखांचे कार लोन घेतले, तर तुम्हाला दर महिन्याला 24,889 EMI भरावा लागेल.या हिशोबाने 7 वर्षांत तुम्ही सुमारे 5.43 लाख रुपयांचा व्याज भराल. त्यामुळे Tata Curvv EV च्या Creative 45 Variant ची एकूण किंमत सुमारे 23.90 लाख रुपयांएवढी होईल.