फोटो सौैजन्य: iStock
भारतीय ऑटो बाजारात आपल्याला अनेक कार उत्पादक कंपन्या पाहायला मिळतील, ज्या देशात अनेक वर्षांपासून दमदार कार ऑफर करत आहे. मात्र, यातील फक्त थोड्याच ऑटो कंपन्यांना ग्राहकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करता आले आहे. अशीच एक कंपनी म्हणजे Tata Motors.
मध्यम वर्गीय लोकांपासून ते श्रीमंत वर्गापर्यंत, टाटा मोटर्सने आपल्या ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार दमदार कार ऑफर केल्या आहेत. ग्राहक देखील कार खरेदी करताना पाहिले प्राधान्य टाटा मोटर्सच्या कारला देत असतात. कंपनीने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये सुद्धा दमदार कार ऑफर केल्या आहेत. एसयूव्ही सेगमेंटमध्ये सुद्धा कंपनीने ग्राहकांना चांगले पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
आता जर तुम्ही टाटा मोटर्सची नवीन एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर एक आनंदाची बातमी आहे. आता लवकरच कंपनी 3 नवीन लहान एसयूव्ही लाँच करू शकते. 4 मीटर सेगमेंटमध्ये आपली पकड आणखी मजबूत करण्यासाठी, कंपनी 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत तीन नवीन मॉडेल बाजारात आणू शकते. कंपनी 3 वर्षांच्या आत या तीन लहान एसयूव्ही मॉडेलपैकी दोन लाँच करण्याची तयारी करत आहे. या वर्षी नोव्हेंबरमध्ये, टाटा मोटर्स ग्राहकांसाठी Tata Punch चे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच करू शकते.
Royal Enfield ची ‘ही’ बाईक झाली अपडेट, नव्या फीचर्ससह लवकरच होणार लाँच
माहितीनुसार, टाटा पंचचा फेसलिफ्ट व्हर्जन 10.25 -इंचाच्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंटसह दिला जाऊ शकतो जो सध्याच्या मॉडेलमधील 7.0 -इंचाची जागा घेईल. याशिवाय, या एसयूव्हीमध्ये इतर अनेक महत्त्वाच्या सुधारणा अपेक्षित आहेत, ज्यामध्ये 4-इंचाचा ड्रायव्हर डिस्प्ले मोठ्या पॅनेलसह बदलला जाईल.
नवीन टाटा पंचला सध्याच्या मॉडेलप्रमाणेच 1.2-लिटर पेट्रोल आणि पेट्रोल-CNG इंजिन पर्यायांसह बाजारात आणले जाऊ शकते. याशिवाय या कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल तसेच ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन (AMT) पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सध्या Tata Punch CNG फक्त 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे, परंतु नवीन पंच CNG मध्ये 5-स्पीड AMT दिला जाऊ शकतो.
टाटा मोटर्स 2027 मध्ये सेकंड जनरेशन Nexon (कोडनेम: गरुड) बाजारात आणण्याची शक्यता आहे. या अपडेटेड SUV मध्ये 1.2-लिटर पेट्रोल आणि पेट्रोल-CNG इंजिन पर्याय मिळतील. मात्र, या कारमध्ये 1.5-लिटर डिझेल इंजिन पर्याय दिला जाणार नाही. नव्या Nexon मध्ये 12.3-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, लेव्हल-2 ADAS आणि पॉवर ड्रायव्हर सीट यांसारखे प्रीमियम फीचर्स दिले जातील.
CNG Car खरेदी करताना ‘या’ पर्यायांवरून ग्राहकांची नजरच हटत नाही, किंमत तुमच्या खिशाला परवडणारी
याशिवाय टाटा मोटर्स Scarlet SUV सुद्धा बाजारात आणू शकते. ही कार दमदार आणि मस्क्युलर बॉडी डिझाइनसह सादर केली जाईल आणि थेट Mahindra Thar व Maruti Suzuki Jimny ला टक्कर देईल.