फोटो सौजन्य- सोशल मीडिया
पीएनबी बॅंक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदीवर ईडी (सक्तवसुली संचालनालय ) ने मोठी कारवाई केली आहे. ED ने नीरव मोदीची 29.75 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. युके कार्टानेही त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. या अगोदरही इडीकडून नीरव मोदीची भारत आणि परदेशातील 2596 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली गेली होती. 2019 साली मुंबई पीएमएलए ( Prevention Money Laundering Act) कोर्टाने फरार आर्थिक अपराधी घोषित केला होता. PNB ( Punjab National Bank) बॅंक घोटाळ्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील या बॅंकेची प्रतिमा मलिन झाली होतीच मात्र या घोटाळ्यामुळे खातेदारकांनाही चिंता निर्माण झाली होती.
या प्रकरणात प्रमुख आरोपी नीरव आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी आणि बँक अधिकारी सामील
पीएनबी बॅंक घोटाळेबाज, फरार नीरव मोदी सध्या ब्रिटनच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्याने कथित पीएनबी बँक कर्ज फसवणूक प्रकरणात भारतातील प्रत्यार्पणाची याचिका गमावली आहे, ज्याची सीबीआयकडून चौकशी देखील केली जात आहे. कर्ज फसवणूक प्रकरणात प्रमुख आरोपी नीरव आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी आणि बँक अधिकारी सामील होते. त्यांची ईडीकडून मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली चौकशी करत आहे.
सातव्यांदा त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे
प्रमुख आरोपी नीरव मोदीला मुंबई पीएमएलए कोर्टाने डिसेंबर 2019 मध्ये फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित केले होते. आणि 2019 मध्येच त्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली होती. नीरव मोदीविरुद्ध प्रत्यार्पणाची कारवाई यूकेमध्ये सुरू आहे. 2024 च्या सुरुवातीला नीरव मोदीने ब्रिटीश न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता, पण तो फोटाळण्यात आला होता.तब्बल सातव्यांदा त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
इतक्या मालमत्तेवर जप्ती कोटींची मालमत्ता बॅंकांना परत केली
ईडीने सांगितले की, आरोपी नीरव आणि त्याच्या साथीदारांची तब्बल 692.90 कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता फरारी आर्थिक गुन्हेगार कायद्याच्या तरतुदींनुसार जप्त करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, 1,052.42 कोटी रुपयांची मालमत्ता पीएनबी बॅंक आणि या प्रकरणाशी संबंधित गट बँकांना यशस्वीरित्या परत करण्यात आली आहे, असे त्यात म्हटले आहे.