बांगलादेशला अंधारात ठेवणार अदानी समुह; वीज बील न भरल्याने दिला इशारा!
शेख हसीना सरकार जाऊन, नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर बांगलादेशमध्ये आर्थिक संकट अधिक गडद होत आहे. अंतरिम सरकारचे पंतप्रधान मोहम्मद युनूस यांनी अलीकडेच कर्ज मिळवण्यासाठी जागतिक बँक, आयएमएफ, आशियाई विकास बँकेसह अनेक ठिकाणचे दरवाजे ठोठावले आहेत. आता बांगलादेशसमोर नवा धोका निर्माण झाला आहे. वीज पुरवठ्याचे बिल मिळावे, यासाठी अदानी समूहाने बांगलादेशवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. अदानी समूहाने अंदाजित 500 दशलक्ष डॉलर भरण्याची मागणी केली आहे.
हे देखील वाचा – अंबानी-अदानी-टाटा नाही… तर ‘या’ मुंबईकराने घेतला देशातील सर्वात महागडा फ्लॅट!
अदानी समूह त्याच्या 1600 मेगावॅटच्या गोड्डा प्लांटमधून बांगलादेशला वीज पुरवतो. शेख हसीना सरकारच्या काळात हा करार झाला होता. आता नवीन सरकारचे पंतप्रधान मोहम्मद युनूसने यांनी यास खूप महागडी डील म्हणण्यास सुरुवात केली आहे. या व्यवहारात पारदर्शकता ठेवली गेली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर शेख हसीना सरकारच्या काळात झालेल्या सरकारच्या अनेक पायाभूत डीलकडे देखील त्यांनी बोट दाखवले आहे.
एका नामांकित इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, मोहम्मद युनूस सरकार अंदाजे 500 दशलक्षचे हे पेमेंट करण्यास नाखूष आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या अदानी समूहाने अंतरिम सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. बांगलादेशमध्ये नव्याने स्थापन झालेल्या अंतरिम सरकारसमोरील सर्वात मोठे संकट बांगलादेशचे कर्ज आहे. अदानी समूहाच्या म्हणण्यानुसार ते सतत अंतरिम सरकारशी बोलत आहेत.
अदानी समुहाने बांग्लादेश सरकारला प्रत्येक परिस्थितीची माहिती दिली आहे. बांगलादेशला वीज पुरवठा करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. परंतु, प्रलंबित बिले अर्थात देयके चिंता वाढवत आहेत. दोन्ही पक्षांची स्वतःची जबाबदारी आहे. त्यांची पूर्तता झाली नाही तर समस्या निर्माण होतील. अहवालात दावा करण्यात आला आहे की, एकट्या बांगलादेशचे वीज बिल 3.7 अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. यापैकी, अंदाजे 492 दशलक्ष डॉलर फक्त अदानी समूहाचे आहेत. बांगलादेशला इतर गोष्टींसह अदानी समूहाला सुमारे 800 दशलक्ष डॉलर्स द्यावे लागणार आहेत.