रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) शेअर बाजारात घसरण आहे. आज शेअर बाजारात (Share Market Update) १४९१.०६ अंकांची घसरण होत ५२,८४२ अंकांवर बंद झाला. तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये ३८२.२० अंकांची घसरण झाली असून १५,८६३.१५ अंकांवर बंद झाला. दोन आठवड्यांपासून शेअर बाजारात घसरण सुरू असून गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होत आहे. रशिया हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खनिज तेल उत्पादक देश असल्याने रशिया -युक्रेन युद्धाचे परिणाम सर्वत्र दिसत आहेत.
This isn’t surprising because the world is effectively at War. The physical battle may be in one country, but the political, economic, cyber, social media & commodity resource battle lines have been drawn & are global. Welcome to World War in the 21st century. https://t.co/PVeg1FUge5
— anand mahindra (@anandmahindra) March 7, 2022
अशा परिस्थितीत रशिया युद्धात उतरल्यानंतर जगातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांमुळे, रशियाला जागतिक बाजारपेठेत ६५ टक्के तेल विकता येत नाही, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती १२५ डॉलर प्रति बॅरल इतक्या झाल्या आहेत. किमती १४ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. याशिवाय धातूंच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. बाजाराच्या या घसरणीबाबत उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली. या परिस्थितीला त्यांनी एकविसाव्या शतकातील जागतिक युद्ध म्हटले आहे.
[read_also content=”शेन वॉर्नचा मृत्यू नक्की झाला तरी कसा ? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून आलं ‘हे’ सत्य बाहेर https://www.navarashtra.com/sports/cricket/shane-warne-postmortom-report-say-that-his-death-was-natural-nrsr-250837/”]
आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले की, “यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही कारण जग प्रभावीपणे युद्धात आहे. भौतिक लढाई एका देशात होऊ शकते. परंतु राजकीय, आर्थिक, सायबर, सोशल मीडिया आणि उपयुक्त संसाधने यांच्यातील युद्धरेषा आखल्या गेल्या असून त्या जागतिक आहेत. एकविसाव्या शतकातील जागतिक युद्धात आपले स्वागत आहे.”