IT Stocks Sell Off: एआयचा धक्का! आयटी शेअर्स २२% घसरले, बाजारात भीतीचे सावट
IT Stocks Sell Off: कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय संदर्भातील जागतिक घडामोडींमुळे भारतीय शेअर बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली असून विशेषतः आयटी क्षेत्रातील शेअर्सना मोठा फटका बसला आहे. गेल्या आठवड्यात आयटी निर्देशांकात सुमारे २२ टक्क्यांपर्यंत घसरण झाल्याची नोंद आहे. अमेरिकास्थित एआय कंपनी एन्थ्रोपिकने सॉफ्टवेअर कोडिंगसारखी कामे जलद आणि कमी मनुष्यबळात करता येतील, असा दावा केल्यानंतर बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले. भविष्यात आयटी कंपन्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त होताच गुंतवणूकदारांनी विक्रीचा दबाव वाढवला. कृत्रिम बुद्धिमत्तेचा परिणाम केवळ आयटीपुरता मर्यादित राहिलेला नाही. ऑनलाइन विमा आणि संपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातही बदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे.
हे देखील वाचा: India–France Partnership: मुंबईत भारत-फ्रान्स भेट; ३.२५ लाख कोटींच्या करारावर स्वाक्षरी
परिणामी पीबी फिनटेक आणि ३६० वन या कंपन्यांच्या शेअर्समध्येही घसरण दिसून आली. डिजिटल आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आधारित व्यवसायांवरही दबाव वाढताना दिसत आहे. झोमॅटो व स्विगी यांसारख्या कंपन्यांबाबत गुंतवणूकदार सावध भूमिका घेत आहेत. तंत्रज्ञानावर आधारित, कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर विस्तार करणाऱ्या व्यवसाय मॉडेलसमोर भविष्यात एआयमुळे स्पर्धा तीव्र होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, कृत्रिम बुद्धिमत्ता दीर्घकालीन परिवर्तन घडवू शकते; मात्र सध्याची घसरण काही अंशी भीती आणि अपुरी माहितीतूनही वाढलेली आहे. याची सध्या चर्चा सुरू झाली आहे.
हे देखील वाचा: Stock Market Today: भारती एअरटेल आणि इटरनलसह ‘या’ शेअर्सवर ठेवा आज तुमचे लक्ष! गुंतवणूक करण्यापूर्वी वाचा तज्ज्ञांचा सल्ला
चुकीची माहिती किंवा अफवांमुळे शेअर बाजारात अचानक विक्री वाढून अस्थिरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी निर्णय घेताना कंपन्यांची मूलभूत स्थिती, नफा, रोख प्रवाह आणि लाभांश परतावा यांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रत्यक्ष परिणाम किती व्यापक आणि किती वेगाने होईल, हे पुढील काळात स्पष्ट होणार असले तरी सध्या बाजारात सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






