Maharashtra Billionaire: देशात सर्वाधिक श्रीमंत ठरले 'हे' राज्य; कोट्यधीश कुटुंबांचा आकडा ऐकुन बसेल धक्का! (फोटो-सोशल मीडिया)
Maharashtra Billionaire: भारतातील श्रीमंत लोकांची संख्या चित्ताच्या वेगाने वाढत आहे. २०२१ पासून कोट्यधीशांची संख्या दुप्पट झाली आहे. सध्या भारतात कोट्यधीशांची संख्या ८,७१,७०० वर पोहोचली आहे, ज्यांची मालमतावर कोटीपेक्षा जास्त आहे. २०२१ मध्ये अशा कुटुंबांची संख्या ४.५८ लाख होती. देशातील इतर सर्व कुटुंबांमध्ये त्यांचा वाटा ०.३१ टक्के आहे. २०१७ ते २०२५ पर्यंत कोट्यधीश कुटुंबांची संख्या ४५ टक्क्यांनी वाढली आहे. तथापि, केवळ काही जण अतिश्रीमंतांच्या श्रेणीत पोहोचले आहेत. गेल्या चार ते पाच वर्षांत भारतातील कोट्यधीश कुटुंबांची संख्या जवळपास ९० टक्क्यांनी वाढली आहे. जर ही गती अशीच राहिली तर भारतातील कोट्यधीश कुटुंबांची संख्या २० लाखांपर्यंत पोहोचू शकते.
महाराष्ट्राची राजधानी मुंबई सर्वात श्रीमंत
दिलेल्या अहवालानुसार, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सर्वांत जास्त कोट्यधीश राहतात, महाराष्ट्रात १,७८,६०० कोट्यधीश कुटुंबे आहेत, त्यापैकी १,४२,००० कोट्यधीश कुटुंबे मुंबईत राहतात. दिल्लीत ६८,२०० कोट्यधीश कुटुंबे आहेत आणि बंगळुरूमध्ये ३१,६०० कोट्याधीश कुटुंबे आहेत. महाराष्ट्राचा जीडीपी ५५ टक्क्यांनी काढला आहे. २०२१ ते २०२५ दरम्यान निफ्टी ५० निर्देशांक जवळजवळ ७० टक्क्यांनी वाढला आहे.
यूपीआय पेमेंट्सना प्राधान्य
इतकेच नव्हे तर, ३५% कोट्याधीश यूपीआय डिजिटल पेमेट करतात, शेअर बाजार, रिअल इस्टेट आणि सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. हा अहवाल आर्थिक स्वातंत्र्याबद्दल कोट्यधीश कुटुंबांचे मत प्रकट करतो. २७ टक्के लोकांनी सांगितले की, ५० कोटी पुरेसे आहेत. २५ टक्के लोकांनी म्हटले की, १० कोटी पुरेसे आहेत. आणखी २० टक्के लोकांनी म्हटले की, २०० कोटी तर जवळजवळ ६० टक्के श्रीमंत कुटुंबे दरवर्षी १ कोटीपेक्षा कमी खर्च करतात.
हेही वाचा: Global Indian Investors: भारतीय गुंतवणूकदारांची जागतिक झेप; परदेशी गुंतवणूक वाढली चारपट
कोट्यधीश करदात्यांची संख्या दशकभरात २.२ लाख
भारतातील कोट्यधीश करदात्यांची संख्या २०१४ च्या करनिर्धारण वर्षाच्या तुलनेत २०२४ च्या करनिर्धारण वर्षात पाच पटीने वाढून २.२ लाख होण्याचा अंदाज आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक विभागाच्या संशोधन अहवालानुसार, गेल्या दशकात करदात्यांची संख्या २.३ पटीने वाढली आहे. २४ च्या करनिर्धारण वर्षाच्या तुलनेत ८.६२ कोटी होती. अहवालात असेही म्हटले आहे की, हा आकडा बराच चांगला आहे, कारण १० लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लोकांची संख्या वाढली आहे. गेल्या १० वर्षांत भारतातील मध्यमवर्गीयांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे.






