Budget 2024 Live: आज सादर केला जाणार देशाचा अर्थसंकल्प; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणांकडे देशवासियांचे लक्ष
Budget 2024 Live: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. त्यात आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचा पहिला अर्थसंकल्प असणार आहे. यामध्ये सर्वच वर्गातील घटकाला यामधून खूप साऱ्या आशा आहेत.
यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी महिन्यात अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. आता सादर होणाऱ्या पूर्ण अर्थसंकल्पाकडून देशातील नोकरदार वर्गापासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वांनाच अपेक्षा आहेत. सोमवारी पहिल्या दिवशी लोकसभेत सीतारामन यांनी संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला. सर्वेक्षणात सरकारचा फोकस प्रायव्हेट सेक्टर आणि पीपीपी वर आहे. यावेळी आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये जीडीपी सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) ६.५ ते ७ टक्के असेल, असा अंदाज सरकारकडून वर्तविण्यात आला आहे.
विशेष म्हणजे २०२३-२४ मध्ये नोंद झालेल्या ८.२ टक्के विकासदरापेक्षा हा अंदाज कमी आहे. त्याशिवाय, गेल्या तीन आर्थिक वर्षांमध्ये विकासदर ७ टक्क्यांच्या वर राहिला असताना यंदा मात्र तो ७ टक्क्यांच्या खाली राहील, असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालामध्ये वर्तवण्यात आला आहे.