अर्थमंत्री निर्मला सीतारमण (फोटो -सोशल मिडिया)
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केले बजेट
सलग 9 वेळा सादर केला अर्थसंकल्प
निवडणुका असलेल्या राज्यांसाठी मोठ्या घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प आज सादर झाला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सलग 9 वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. बजेटमधून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आरोग्य, कृषी, संरक्षण, रेल्वे आणि अन्य क्षेत्रात मोठा निधी दिला जाणार आहे. दरम्यान आगामी काळात विधानसभा निवडणूक होणाऱ्या राज्यांमध्ये देखील मोठ्या घोषणा करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
या वर्षात पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि तामिळनाडू राज्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. दरम्यान विधानसभा निवडणूक होणाऱ्या राज्यांमध्ये अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्याचे दिसून येत आहे. ओडीशा, तामिळनाडू, अन्य राज्यांमध्ये रेयर अर्थ कॉरीडॅार तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
तसेच वाराणसी ते सीलगुडीपर्यंत रेल कॉरीडॅार देखील तयार केला जाणार आहे. रेअर अर्थ मिनरल्समध्ये भारत चीनवर अवलंबून आहे. त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रेल्वेशी संबंधित मोठ्या घोषणा केल्या आहेत. बजेटमध्ये 7 हायस्पीड रेल्वे कॉरीडॅारचा प्रस्ताव देखील ठेवण्यात आला आहे. एकंदरीत आगामी विधानसभा निवडणुका लक्षात ठेवून त्या राज्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर
मुंबई-पुणे
पुणे-हैदराबाद
हैदराबाद-बेंगळुरू
हैदराबाद-चेन्नई
चेन्नई-बेंगळुरू
दिल्ली-वाराणसी
वाराणसी-सिलिगुडी
Union Budget 2026: AI आणि नवीन तंत्रज्ञान बनणार भारताच्या विकासाचे इंजिन – निर्मला सीतारमण
बजेट मांडताना अर्थमंत्र्यांचे मोठे विधान
केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, “मी आज माघ पौर्णिमा आणि गुरू रविदास यांच्या जयंतीच्या शुभ दिनानिमित्त अर्थसंकल्प सादर करत आहे. गेल्या वर्षभरात भारताची आर्थिक स्थिती चांगली आहे. गेल्या 12 वर्षांपासून आमचे सरकार गुंतवणूक वाढवण्यावर भर देत आहे. ”
पुढे बोलताना अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अनेक बदल करण्यात आले आहेत. स्वावलंबन हा आपल्या अर्थव्यवस्थेचा मुख्य मंत्र आहे. सरकारी निर्णयाचा नागरिकांना फायदा व्हावा यासाठी आम्ही सर्वोपरी प्रयत्न केले आहेत. गेल्या वर्षी देशाची अर्थव्यवस्था 7 टक्के विकास दराने वाढली आहे.”
पाच वर्षांत २० नवीन जलमार्ग कार्यान्वित होतील. वाराणसी आणि पटना येथे जहाज दुरुस्ती सुविधा स्थापन केल्या जातील. सीप्लेन व्हीजीएफ योजना सुरू केली जाईल.






