Budget 2026: भारतीय इतिहासातील असा एकमेव अर्थसंकल्प जेव्हा नव्हता बनवला गेला हलवा; जाणून घ्या यामागील रंजक कारण ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Why was Halwa Ceremony cancelled in 2022 : फेब्रुवारी महिना जवळ आला की संपूर्ण देशाचे लक्ष अर्थमंत्र्यांच्या ‘बजेट’ (Budget) ब्रीफकेसकडे लागलेले असते. यंदा २०२६ चा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणार आहेत. मात्र, अर्थसंकल्प संसदेत येण्यापूर्वी अर्थ मंत्रालयात एक अतिशय रंजक आणि पारंपरिक विधी पार पडतो, तो म्हणजे ‘हलवा समारंभ’ (Halwa Ceremony). हा समारंभ म्हणजे अर्थसंकल्पाच्या छपाईचा (आता डिजिटल स्वरूपात) अधिकृत श्रीगणेशा मानला जातो. पण तुम्हाला माहित आहे का? दशकानुदशके सुरू असलेली ही गोड परंपरा भारतीय इतिहासात एकदा मोडली गेली होती.
भारतीय संस्कृतीत कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ‘गोड’ खाऊन करण्याची पद्धत आहे. हीच परंपरा अर्थ मंत्रालयानेही जोपासली आहे. जेव्हा अर्थसंकल्पाचा मसुदा पूर्ण होतो, तेव्हा एका मोठ्या कढईत हलवा बनवला जातो. अर्थमंत्री स्वतः हा हलवा आपल्या सहकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना वाढतात. या समारंभाचा अर्थ असा की, आता अर्थसंकल्पाची गोळाबेरीज पूर्ण झाली असून तो अंतिम टप्प्यात आला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : BRICS :भारताचा ‘मास्टरस्ट्रोक’! डॉलरची मक्तेदारी संपवण्यासाठी 11 देशांची मोठी तटबंदी; ट्रम्प यांच्या धमकीला मोदींचे ‘डिजिटल’ उत्तर
स्वातंत्र्यानंतर प्रत्येक वर्षी न चुकता होणारा हा समारंभ २०२२ मध्ये आयोजित करण्यात आला नव्हता. याचे कारण कोणतेही राजकीय नव्हते, तर संपूर्ण जगाला विळखा घालणारा कोविड-१९ विषाणू होता. त्यावेळी ओमिक्रॉन व्हेरिएंटची लाट जोरात होती. सामाजिक अंतर पाळण्यासाठी आणि मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने हा समारंभ रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याऐवजी कर्मचाऱ्यांना मिठाईचे बॉक्स वाटण्यात आले होते. ५२ वर्षांच्या अखंड परंपरेला लागलेला हा पहिलाच मोठा ‘ब्रेक’ होता.
The Halwa Ceremony is a long-standing tradition observed before the #UnionBudget that marks the start of the final and confidential preparation process.
Swipe to explore its significance and origins. #UnionBudget2026 #BudgetSession2026 #Budget pic.twitter.com/M0k97BmjpU — National Centre for Financial Education (@ncfeindia) January 31, 2026
credit – social media and Twitter
हा समारंभ केवळ गोड खाण्यापुरता मर्यादित नाही. या विधीनंतर अर्थसंकल्पाशी संबंधित सुमारे १०० अधिकारी आणि कर्मचारी अर्थ मंत्रालयाच्या ‘नॉर्थ ब्लॉक’ मध्ये दहा दिवसांसाठी अक्षरशः बंदिस्त होतात. याला ‘लॉकिंग’ पिरियड म्हटले जाते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Epstein files: जावई कुशनर आणि रशियन पैसा! एपस्टाईन फाईल्स संबंधित FBI अहवालात ट्रम्प कुटुंबावर गंभीर आरोपांची सरबत्ती
यंदाचा अर्थसंकल्प रविवार, १ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. सुट्टीच्या दिवशी अर्थसंकल्प सादर होण्याची ही दुर्मिळ वेळ आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीयांना टॅक्स सवलत आणि शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणांची अपेक्षा आहे. हलवा समारंभ झाल्यानंतर आता सर्वांच्या नजरा अर्थमंत्र्यांच्या भाषणाकडे लागल्या आहेत.
Ans: अर्थसंकल्पाची छपाई सुरू होण्यापूर्वी अर्थ मंत्रालयात मिठाई (हलवा) वाटून कामाची शुभ सुरुवात केली जाते, त्याला हलवा समारंभ म्हणतात.
Ans: स्वातंत्र्यानंतर केवळ २०२२ मध्ये कोविड-१९ च्या तिसऱ्या लाटेमुळे सुरक्षेच्या कारणास्तव हलवा समारंभ आयोजित करण्यात आला नव्हता.
Ans: अर्थसंकल्पाची गोळाबेरीज आणि त्यातील महत्त्वाची माहिती लीक होऊ नये म्हणून गोपनीयता राखण्यासाठी अधिकाऱ्यांना १० दिवस कोणाशीही बोलू दिले जात नाही.






