क्लीअरट्रिपकडून Big Billion Day 2025 पूर्वी उद्योगामधील पहिले व्हिसा डिनायल कव्हर लाँच
भारत : क्लीअरट्रिप या फ्लिपकार्ट कंपनीने बहुप्रतिक्षित बिग बिलियन डेज (BBD) २०२५ पूर्वी त्यांच्या नवीन व्हिसा डिनायल कव्हर ऑफरिंगची घोषणा केली आहे. हे उद्योगातील पहिले वैशिष्ट्य झीरो कॉस्टसह येते आणि त्याच्या एकीकृत व्हिसा डिनायल कव्हरसह आंतरराष्ट्रीय प्रवासामधील सर्वात मोठ्या चिंतेचे निराकरण करते.
बुकिंग प्रवाहामध्ये व्हिसा डिनायल कव्हर समाविष्ट केल्याने ग्राहक आत्मविश्वाासाने त्यांच्या आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सचे बुकिंग करू शकतात, जेथे त्यांना माहित आहे की क्लीअरट्रिप कोणतेही लपलेले शुल्क किंवा अतिरिक्त शुल्कांशिवाय १०० टक्के परतफेड देईल. हा धाडसी पुढाकार आंतरराष्ट्रीय प्रवासामध्ये विश्वास आणि पारदर्शकतेला नव्या उंचीवर घेऊन जाण्यास सज्ज आहे, ज्यामुळे क्लीअरट्रिपवर ट्रिपचे नियोजन विनासायास आणि आनंददायी अनुभव होईल.
आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स बुक करताना ग्राहकांना नेहमीच सतत चिंता वाटत असते की ‘जर माझा व्हिसा नाकारला गेला तर?’. हे व्हिसा डिनायल कव्हर ग्राहकांना कोणतीही चिंता न करता बुकिंग करण्याची सुविधा देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे, जेथे त्यांना त्यांचा व्हिसा नाकारला गेला तर त्यांच्या तिकिटावर पूर्ण परतावा मिळण्याची खात्री मिळते.
क्लीअरट्रिपच्या चीफ बिझनेस अँड ग्रोथ ऑफिसर मंजरी सिंघाल म्हणाल्या, ”व्हिसा डिनायल कव्हरसह आम्ही आंतरराष्ट्रीय ट्रिप बुक करताना सामना कराव्या लागणाऱ्या सर्वात मोठ्या चिंतेचे प्रत्यक्ष निराकरण करत आहोत. हे नवीन वैशिष्ट्य परतावा करण्यासोबत ग्राहकांना समाधान देखील देते, तसेच खात्री देते की ट्रिपचे नियोजन करताना चिंता न भेडसावता उत्साहवर्धक अनुभव मिळेल.”
● ग्राहकांसाठी मूल्य: सर्व आंतरराष्ट्रीय फ्लाइट बुकिंग्जसह मोफत.
● पात्र व्हिसा प्रकार: फक्त पर्यटक व्हिसासाठी लागू.
● पात्र राष्ट्रीयत्व: फक्त भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध.
● वयाचे निकष: वयाचे कोणतेही बंधन नाही; सर्व प्रवाशांसाठी खुले.
● भाडे प्रकार: पूर्णपणे आणि अंशतः परत करण्यायोग्य विमान भाड्यावर वैध.
● कव्हरेज व्याप्ती: मूळ भारतातून आंतरराष्ट्रीय प्रवास.
● रद्द करण्याची मुदत: प्रस्थानाच्या किमान २४ तास आधी रद्द करणे आवश्यक आहे.
या महत्त्वपूर्ण संरक्षणाव्यतिरिक्त क्लीअरट्रिप अनेक उत्सवी ऑफरिंग्जसह बिग बिलियन डे साजरा करत आहे. फ्लॅश सेल्सदरम्यान देशांतर्गत फ्लाइट्स फक्त ९९९* रूपयांपासून उपलब्ध आहेत, तर आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवर २० टक्के सूट* आहे. तसेच क्लीअरट्रिपने २-स्टार ते ५-स्टार श्रेणींमधील २०,००० मालमत्तांवरून ८०,००० हून अधिक मालमत्तांपर्यंत आपला हॉटेल पोर्टफोलिओ मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. ही मिश्रित वाढ फॅमिली हॉलिडे व वेलनेस रिट्रीट्स ते किफायतशीर निवास सुविधा आणि प्रीमियम लक्झरी गेटवेपर्यंत पर्यटकांच्या प्रत्येक गरजांची पूर्तता करते. तसेच किमान एक मूल किंवा नवजात बाळासह तीन किंवा अधिक प्रवाशांच्या बुकिंग्जसाठी चाइल्ड फ्लाइज फ्री ऑफर यंदा सणासुदीच्या काळात परतली आहे, ज्यामुळे कुटुंबांना देशांतर्गत प्रवासावर मोठी बचत करता येईल.