Income Tax Return, (Concept Photo)
Income Tax Return Filing Last Date: केंद्र सरकारने वित्त-वर्ष 2024-25 साठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत 31 जुलैवरून वाढवून 15 सप्टेंबर 2025 केली होती. म्हणजेच, आज ITR भरण्याचा शेवटचा दिवस आहे. पण, पोर्टलवर प्रचंड लोड आल्यामुळे करदात्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, विशेषतः AIS (Annual Information Statement) डाउनलोड करताना. अनेक चार्टर्ड अकाउंटंट्स आणि करदात्यांनी AIS डाउनलोड न झाल्याची तक्रार केली आहे. मात्र, ही समस्या सर्वांसाठी सारखी नसून, आयकर विभागाने यावर काही सोपे उपाय सांगितले आहेत.
आयकर विभागाने 13 सप्टेंबर 2025 रोजी सोशल मीडियावर स्पष्ट केले की, आता AIS कोणत्याही थर्ड-पार्टी सॉफ्टवेअर टूलमधून डाउनलोड करता येणार नाही. AIS डाउनलोड करण्याचा फक्त एकच मार्ग आहे: आधी ई-फायलिंग ITR पोर्टलवर लॉग इन करा आणि त्यानंतर AIS कंप्लायंस पोर्टल (https://ais.insight.gov.in/complianceportal/ais) वर जा.
माहितीनुसार, काही दिवसांपासून कंप्लायंस पोर्टलवरून AIS डाउनलोड करण्याचा आणि ITR अपलोड करण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी आम्ही अनेक उपाय केले, जसे की Incognito Mode, ब्राउजरचा कॅश क्लियर करणे, वायर्ड इंटरनेट वापरणे आणि गुगल क्रोम व्यतिरिक्त मायक्रोसॉफ्ट एज ब्राउजरचा वापर करणे.” कॅश क्लियर करून सकाळी लवकर किंवा उशिरा रात्री प्रयत्न केल्यावर काही यश मिळाले, पण दिवस पुढे गेल्यावर पोर्टल पुन्हा बंद होत होते.
आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पोर्टलवरील समस्या काही प्रमाणात कमी करण्यासाठी तुम्ही खालील उपायांचा अवलंब करू शकता:
या सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही पोर्टलवरील अडचणी काही प्रमाणात कमी करू शकता आणि तुमचा आयकर रिटर्न भरण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकता.
जर आज आयटीआर दाखल केला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल. यासोबतच, आयकर विभागाने स्पष्ट केले आहे की 2025-26 या कर निर्धारण वर्षासाठी आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवली जाणार नाही. याचा अर्थ असा की आज आयटीआर दाखल न करणाऱ्या करदात्यांना उद्यापासून दंड भरावा लागेल.