20 दिवसात पैसे दुप्पट; दोन दिवसात 20 टक्के परतावा; बजेटनंतर 'या' शेअरमध्ये जोरदार उसळी!
मंगळवारी (ता.२४) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. ज्यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. अर्थात बाजारात बड्या-बड्या शेअर्सची पडझड झाली. असे असतानाही एका शेअरने शेअर बाजारात गेल्या दोन दिवसांत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. विशेष म्हणजे बजेटमध्ये एक घोषणा होताच या शेअरने तब्बल १० टक्क्यांनी उसळी घेतली. इतकेच नाही तर आज देखील या शेअरमध्ये १० टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.
दोन दिवसात 20 टक्के परतावा
उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना १० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. हीच बाब या शेअरमध्ये वाढ होण्यासाठी प्रभावी ठरली आहे. आयईसी एज्युकेशन लिमिटेड कंपनी असे या कंपनीचे नाव असून, ती शिक्षण क्षेत्रातील नामांकित कंपनी आहे. कंपनीच्या शेअरमध्ये अर्थसंकल्पाच्या दिवशी १० टक्के उसळी तर आज देखील कंपनीच्या शेअरमध्ये १० टक्के वाढ नोंदवली गेली आहे. ज्यामुळे कंपनीने दोनच दिवसांत आपल्या गुंतवणूदारांना २० टक्के रिटर्न्स दिले आहे. विशेष म्हणजे हा पेंनी स्टॉक आहे. ज्याची किंमत ४ टक्क्यांहून कमी आहे.
हेही वाचा : अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशीही शेअर बाजाराची गटांगळी; वाचा… कोणते शेअर्स घसरले!
20 दिवसात पैसे दुप्पट
विशेष म्हणजे या कंपनीच्या शेअर्सने अवघ्या 20 दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. जर आपण गेल्या 5 दिवसांबद्दल बोललो झाले तर या शेअरमधून 70 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. 4 जुलै रोजी या कंपनीचा शेअर 1.77 रुपयांवर होता. आज म्हणजेच बुधवारी तो 3.87 रुपयांवर पोहचला आहे.
अर्थात या शेअरने गुंतवणूकदारांना 20 दिवसांत सुमारे 118 टक्के परतावा दिला आहे. त्यामुळे 20 दिवसांपूर्वी एखाद्या व्यक्तीने आयईसीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्यास आता 2.18 लाख रुपये इतका परतावा मिळाला असता. अर्थात गुंतवणूकदारांना या शेअरमुळे तब्बल 1.18 लाख रुपयांचा फायदा झाला असता.
आयईसी एज्युकेशन लिमिटेड कंपनीचे मार्केट कॅप सध्या 5.91 कोटी रुपये आहे. कंपनीची स्थापना 1994 साली झाली. पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे खूप धोकादायक असते. ज्यामुळे अनेक तज्ज्ञ पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाहीत आणि त्यांच्यापासून दूर राहण्यास सांगतात. याचे कारण असे की हे शेअर्स जितक्या वेगाने वाढतात तितक्या वेगाने ते घसरतात.