वर्षभरात पैसे दुप्पट, गुंतवणूकदार मालामाल; 'हा' मल्टीबॅगर स्टॉक लवकरच होणार स्प्लिट!
मागील काही वर्षात अनेक स्टॉकने गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून दिला आहे. यामध्ये श्रेष्ठ फिनवेस्ट या कंपनीच्या स्टॉकचे देखील नाव आघाडीवर आहे. 5 रुपयांपेक्षा कमी असलेला हा स्टॉक एका वर्षात दुप्पट झाला आहे. हा शेअर 1.10 रुपयांहून 2.41 रुपयांच्या पातळीवर पोहचला आहे. आता कंपनीच्या संचालक मंडळाने शेअर स्प्लिटचा निर्णय जाहीर केला आहे. संचालकांच्या बैठकीत एका शेअरचे दोन हिस्से करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
शेअरचे दोन हिस्से करण्यात येणार
कंपनी संचालक मंडळाच्या बैठकीत झालेल्या घडामोडीची माहिती स्टॉक एक्सचेंजला देण्यात आली आहे. 2 रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या शेअरचे दोन हिस्से करण्यात येतील. या घडामोडीनंतर शेअरची फेस व्हॅल्यू कमी होऊन 1 रुपये होईल. कंपनीने स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट, तारीख अजून जाहीर केलेली नाही. येत्या काही दिवसात याविषयीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
(फोटो सौजन्य : istock)
हेही वाचा : ओला इलेक्ट्रिक कंपनी 6000 कोटींचा आयपीओ लॉन्च करणार; गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी!
2016 मध्ये स्टॉक स्प्लिट
कंपनी दुसऱ्यांदा शेअर स्प्लिट करत आहे. यापूर्वी कंपनीने 2016 मध्ये शेअर स्प्लिट केला होता. तेव्हा शेअर 5 भागांमध्ये विभागला गेला होता. तेव्हा झालेल्या शेअर विभाजनानंतर कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू कमी होऊन 2 रुपये प्रति शेअर झाली होती.
शेअर बाजारात दमदार कामगिरी
एक महिन्यापूर्वी या शेअरची किंमत 1.88 रुपये होती. सध्या हा स्टॉक 2.41 रुपयांवर पोहचला. एकाच महिन्यात कंपनीच्या स्टॉकमध्ये 25 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर गेल्या 6 महिन्यात पेनी स्टॉकचा भाव 90 टक्के वाढला.
हेही वाचा : 1 ऑगस्टपासून बदलणार ‘हे’ नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडणार!
वर्षभरात गुंतवणूकदारांना 120 टक्के रिटर्न
2024 मध्ये श्रेष्ठ फिनवेस्टच्या शेअरमध्ये 85 टक्के तेजी दिसून आली. तर गेल्या एका वर्षापासून हा स्टॉक जवळ बाळगाणाऱ्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत 120 टक्के रिटर्न दिला आहे. त्यांचा पैसा दुप्पट झाला आहे. शेअर बाजारात कंपनीचा 52 आठवड्यातील उच्चांक 2.56 रुपये तर 52 आठवड्यातील निच्चांक 0.98 रुपये आहे.