फोटो सौजन्य - Social Media
भारतीय संस्कृतीत एखाद्याची चाकरी करण्याला एक विशेष महत्व आहे. येथे बाळाला लहानपणापासून तयारच केलं जातं, पुढे होऊन कुणाची तरी नोकरी करण्यासाठी. इथे प्रत्येकाला साम्राज्य चालवायचं तसेच त्याला मोठे करायचे आहे, पण ते साम्राज्य दुसऱ्या कुणाचे तरी असते. स्वतःचे विशाल साम्राज्य तयार करण्यासाठी दिवसरात्र झटणारे फार कमी असतात. दिवसरात्र कुणाची तरी नोकरी करून हातामध्ये येणाऱ्या पगाराचा योग्य नियोजन करून त्यात वाढ करणारे फार कमी आहेत. हातात आलेली रक्कम वाढवण्याचे अनेक साधने आहेत. पण लोकं जोखीम घेण्यात आणि विचार करण्यास घाबरतात. खरं म्हणजे, या जोखीमींना मात करत अनेक जणांनी कोट्यांची रांग उभी केली आहे. याच संदर्भात, प्रसिद्ध कॉन्टेन्ट क्रिएटर अंकुर वारिकू यांनी एक पोस्ट शेअर केली होती. चला तर मग जाणून घेऊयात, कोण आहेत अंकुर वारिकू?
जर तुम्ही सोशल मीडियाशी नेहमी जोडलेले असाल तर अंकुर वारिकू हे नाव तुमच्यासाठी फार काही नवीन नसेल. अंकुर एक कॉन्टेन्ट क्रिएटर आहेत. अंकुर त्यांच्या पत्नीसह वेबवेदा प्राइवेट लिमिटेड एक होल्डिंग कंपनीब चालवतात. या कंपनी अंतर्गत ३ विविध युनिट्स आहेत. त्यातील पहिली ‘ब्रँड वारिकू’ आहे. ही कंपनी सोशल मीडियावर कॉन्टेन्ट तयार करते. तसेच शैक्षणिक कॉन्टेन्ट तयार करण्यासाठी ‘वेबवेदा’ नावाचा एक युनिट आहे. तर निवेश नावाचा तिसरा युनिट आहे.
विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी अंकुर यांनी एक X पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी लोकांना गुंतवणुकीबद्दल जागृत केले होते. आपल्या ठराविक पगारावर निर्भर न राहता, त्यामध्ये वाढ करा आणि आपल्या जीवनशैलीला आणखीन खुलून जगा. त्यांनी लोकांना गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांचे म्हणने आहे की, ” दोन प्रकारची लोकं आहेत, एक जे दिवसरात्र नोकरी करतात, थकतात आणि मिळालेल्या रकमेत आनंद मानतात. आणि दुसरे ते असतात, जे सटॉक्सवर नजर ठेवून असतात आणि ट्रेडिंग करतात.” त्यांचे असे म्हणणे आहे की,” SIP सारख्या लॉंगटर्म स्कीममध्ये गुंतवणूक करणे कधीही फायद्याचे असते.”
सूत्रांच्या हवाल्याने अंकुर यांचा २०२४ वर्षाचा गुंतवणूक डेटा खालीलप्रमाणे:
अंकुर वारिकू यांनी म्युच्युअल फंडामध्ये 70 लाख रुपये, PMS (पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस) मध्ये 8.13 कोटी रुपये, स्टार्टअप कोलोनमध्ये 1.62 कोटी रुपये, स्टार्टअप इक्विटीमध्ये 3.49 कोटी रुपये, स्टॉक (भारत) मध्ये 95 लाख रुपये, स्टॉक (अमेरिका) मध्ये 93 लाख रुपये, आणि रिअल इस्टेटमध्ये 3.75 कोटी रुपये गुंतवले आहेत.