ईपॅक प्रीफॅब टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा पहिला IPO
ईपॅक प्रीफॅब टेक्नॉलॉजीज लिमिटेडने त्यांच्या पहिल्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरसाठी प्रत्येकी २ रुपये दर्शनीमूल्याच्या इक्विटी शेअरसाठी १९४ रु. ते २०४ रु. असा किंमतपट्टा निश्चित केला आहे. कंपनीचा प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (आयपीओ किंवा इश्यू) बुधवार, २४ सप्टेंबर २०२५ रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि शुक्रवार, २६ सप्टेंबर २०२५ रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान ७३ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर ७३ इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावू शकतात. हा आयपीओ ३०० कोटी रुपयांपर्यंतचा एक नवीन इश्यू आहे आणि १०,०००,००० शेअर्सपर्यंत विक्रीसाठी ऑफर आहे.
कशासाठी होणार वापर?
या नवीन इश्यूमधून मिळणारे १०२.९ कोटी रुपयांचा निधी राजस्थानच्या शाहजहांपूर येथील घीलोथ औद्योगिक क्षेत्र येथे सँडविच इन्सुलेटेड पॅनेलच्या कायम उत्पादनासाठी आणि प्री-इंजिनिअर्ड स्टील बिल्डिंगच्या निर्मितीसाठी नवीन उत्पादन सुविधा उभारण्यासाठी भांडवली खर्चाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरले जाईल. तसेच, आंध्र प्रदेशातील मंबट्टू (युनिट ४) येथील विद्यमान उत्पादन सुविधेच्या विस्तारासाठी भांडवली खर्चासाठी ५८.१ कोटी रुपये वापरण्यात येतील जेणेकरून प्री-इंजिनिअर्ड स्टील बिल्डिंग क्षमता वाढेल. कंपनीने घेतलेल्या काही कर्जांची पूर्ण किंवा अंशतः परतफेड आणि/किंवा पूर्व-पेमेंटसाठी आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी ७० कोटी रुपये वापरण्यात येतील.
कधी झाली स्थापना
कंपनीची स्थापना १९९९ मध्ये झाली आणि तिचे दोन व्यवसायिक क्षेत्र आहेत – प्री-फॅब बिझनेस, ज्यामध्ये ती ग्राहकांना टर्नकी आधारावर संपूर्ण उपाय प्रदान करते. त्यामध्ये प्री-इंजिनिअर स्टील इमारतींचे डिझाइनिंग, उत्पादन, स्थापना आणि उभारणी, प्री-फॅब बिझनेस, भारतातील आणि परदेशात प्री-फॅब्रिकेटेड स्ट्रक्चर्स आणि त्याचे घटक, (प्री-फॅब बिझनेस) आणि भारतातील बांधकाम, पॅकेजिंग आणि ग्राहकोपयोगी वस्तू (ईपीएस पॅकेजिंग बिझनेस) सारख्या विविध उद्योगांसाठी विस्तारित पॉलिस्टीरिन शीट्स आणि ब्लॉक्स (ज्याला ईपीएस ब्लॉक मोल्डेड उत्पादने आणि ईपीएस शेप मोल्डेड उत्पादने असेही म्हणतात) चे उत्पादन समाविष्ट आहे.
महसुलात होतेय वेगाने वाढ
क्रिसिलच्या अहवालानुसार, कंपनी ऑपरेशन्समधून मिळणाऱ्या महसुलाच्या बाबतीत सर्वात वेगाने वाढणारी कंपनी आहे.आर्थिक वर्ष २२-२४ दरम्यान ४१.७९ टक्क्यांचा चक्रवाढ वार्षिक वाढ दर नोंदवला आहे आणि प्री-फॅब व्यवसायातून मिळालेल्या महसुलात आर्थिक वर्ष २२-२४ दरम्यान ५५.४८ टक्क्यांचा ची चक्रवाढ वाढ नोंदवली गेली आहे. आर्थिक वर्ष १९ ते आर्थिक वर्ष २५ दरम्यान प्री-इंजिनिअर स्टील बिल्डिंग उद्योगाचा विस्तार सुमारे ८.३ टक्क्यांच्या चक्रवाढ दराने झाला, जो आर्थिक वर्ष १९ मध्ये १३० अब्ज रुपयांवरून आर्थिक वर्ष २५ मध्ये २१० अब्ज रुपयांपर्यंत वाढला.
IPO in India: पुढच्या आठवड्यात 5 नवे IPO उघडणार, 12 कंपन्यांची शेअर बाजारात होणार लिस्टिंग
कशी आहे सुविधा
प्री-फॅब व्यवसायात ३१ मार्च २०२५ पर्यंत कंपनीची ग्रेटर नोएडा (उत्तर प्रदेश), घीलोथ (राजस्थान) आणि मंबट्टू (आंध्र प्रदेश) येथे असलेल्या तिच्या तीन उत्पादन सुविधांमध्ये एकूण स्थापित क्षमता १३३,९२२ टन प्री-इंजिनिअर क्षमता आणि ५,१०,००० चौरस मीटर सँडविच इन्सुलेटेड पॅनेल क्षमता आहे. तिच्या उत्पादन सुविधांव्यतिरिक्त, कंपनीची नोएडा (उत्तर प्रदेश), हैदराबाद (तेलंगणा) आणि विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) येथे तीन डिझाइन केंद्रे देखील आहेत.