Stock Market Today: निफ्टी - सेन्सेक्समध्ये आज तेजी की मंदी? कोणते स्टॉक्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न? जाणून घ्या तज्ज्ञांचा अंदाज
सोमवारी, भारतीय शेअर बाजार विक्रीच्या जोरावर मोठ्या प्रमाणात घसरणीसह बंद झाला, बेंचमार्क निफ्टी ५० २६,००० च्या खाली घसरला. सेन्सेक्स ६०९.६८ अंकांनी म्हणजेच ०.७१% ने घसरून ८५,१०२.६९ वर बंद झाला, तर निफ्टी ५० २२५.९० अंकांनी म्हणजेच ०.८६% ने घसरून २५,९६०.५५ वर बंद झाला. सोमवारी बँक निफ्टी निर्देशांक ५३८.६५ अंकांनी किंवा ०.९०% ने घसरून ५९,२३८.५५ वर बंद झाल. (फोटो सौजन्य – Pinterest)
चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांचे मत आहे की, निफ्टी ५० निर्देशांकाने गेल्या दोन दिवसांतील वाढ पुसून टाकल्याने आणि २६९९० च्या खाली बंद झाल्यामुळे भारतीय शेअर बाजाराचा मूड बिघडला आहे. त्यांनी आज गुंतवणूकदारांसाठी पाच ब्रेकआउट स्टॉकची शिफारस केली आहे. सुमित बगडिया यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज गुंतवणूकदार, लॅटंट व्ह्यू अॅनालिटिक्स, कॅन्टाबिल रिटेल इंडिया लिमिटेड, गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स, व्हीनस रेमेडीज आणि जिंदाल स्टेनलेस या स्टॉक्सची खरेदी करू शकतात.
प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी सांगितले की, गेल्या दोन सत्रांमध्ये दिसलेल्या वाढीमुळे निफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणात नफा झाला. त्यांनी देखील आज इंट्राडे ट्रेडिंगसाठी तीन स्टॉकची शिफारस केली आहे. या स्टॉक्समध्ये जिंदाल स्टेनलेस, डोलत अल्गोटेक, हिंदुस्तान ऑइल एक्सप्लोरेशन कंपनी (HOEC) यांचा समावेश आहे. सुमीत बगाडिया (चॉईस ब्रोकिंग), गणेश डोंगरे (आनंद राठी) आणि शिजू कूथुपलक्कल (प्रभूदास लिल्लाधर) बाजारातील या तज्ञांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी सात इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. यामध्ये कॅन फिन होम्स लिमिटेड, पीबी फिनटेक लिमिटेड, वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड (पेटीएम), युनियन बँक ऑफ इंडिया , केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड, एथर एनर्जी लिमिटेड आणि कोरोमंडेल इंटरनॅशनल लिमिटेड या शेअर्सचा समावेश आहे.
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! ICICI प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचा IPO ‘या’ दिवसा पासून होणार सुरु
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या वेल्थ मॅनेजमेंटच्या डेरिव्हेटिव्ह्ज अँड टेक्निकल्स हेड चंदन टपारिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी दोन स्टॉक आणि विक्री करण्यासाठी एक स्टॉकची शिफारस केली आहे. टपारिया यांनी आज गुंतवणूकदारांना पीबी फिनटेक आणि मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेसचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. दुसरीकडे, त्यांनी हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (हुडको) चे स्टॉक फ्युचर्स विकण्याचा सल्ला दिला आहे.






