Midde East War : एअरस्पेस बंद, विमानांची ये-जा थांबली; कतारमध्ये अडकलेल्या पुणेकर तरुणासाठी 'कतार एअरवेज' ठरली देवदूत (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
याच परिस्थितीत कताहच्या दोहातून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये पुण्यातील प्रसिद्ध टेक क्रिएटर एरशाद कलीबुल्लाह दोहात अडकला आहे. पण या कठीण प्रसंगात त्याला माणुकीचा अनुभव आला असून त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत कतार एअरऐवजचे कौतुक केले आहे.
आधी सिगारेटने फोटो जाळला अन् आता असुरी आनंद; खामेनेईच्या मृत्यूनंतर तरुणींचा जल्लोष, Video Viral
एरशादने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने कतारमधील इराणच्या हल्ल्यामुळे झालेल्या परिस्थितीची अनुभव शेअर केला आहे. त्याने सांगितले की, युद्धाच्या सावटाखाली परिस्थिती अत्यंत तणावाची आहे. त्याने विमानतळावरील लाउंजमध्ये थांबवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु मध्यरात्री प्रवाशांना अचानक कर्मचाऱ्यांनी उठवले. त्याने सांगितले की, सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळ रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले होते.
यामुळे एरशाद आणि इतर प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु कतार एअरऐवजेने परिस्थिती अत्यंत शांततेने हातळली असे एरशादने म्हटले आहे. त्याने सांगितले की, विमानतळावरील कर्मचारी प्रवाशांशी धीराने आणि हसमुखाने बोलत होता. प्रत्येक प्रवाशाला धीर देत होता. सर्व प्रवाशांना फूड कूपन्स देण्यात आले ज्यामुळे त्यांना विमानतळावरील रेस्टॉरंटमध्ये मोफत जेवण करता येईल.
एवढेच नव्हे तर सर्व प्रवाशांची राहण्याची सोय देखील आलिशान 5 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली होती असे एरशादने म्हटले आहे. युद्धाच्या दहशत आणि अनिश्चिततेदरम्यान कतार एअरऐवजने पुणेकर तरुणाला दिलेल्या रॉयल वागणुकीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कतार एअरऐवजचे सध्या कौतुक होत आहे.
This is an appreciation post for @qatarairways and @HIAQatar. – Food coupons were distributed to everyone at the airport. You could just redeem them at the food court. For all meals, no less. – We had decided to stay at the lounge until the airspace opened. In fact, we went… pic.twitter.com/ReWr1PDB2U — Ershad Kaleebullah (@r3dash) March 1, 2026
इराणचा कट्टर नेता वाचायचा पंडीत नेहरुंची पुस्तके; अयातुल्ला अली खामेनेईला भारतीय साहित्याची भुरळ
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






