रस्त्याच्या कडेला सुरुवात... आज अब्जावधींचा व्यवसाय! भारतातील 'या' कंपन्यांनी लिहिली यशोगाथा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
India billion‑dollar success stories : एका छोट्या खोलीतून, रस्त्याच्या फूटपाथवरून किंवा स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून व्यवसाय सुरू करणाऱ्या काही भारतीय कंपन्यांनी आज अब्जावधी रुपयांची उलाढाल करून आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कष्ट, चिकाटी आणि दूरदृष्टीच्या जोरावर या कंपन्यांनी संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा उचलला आहे आणि हजारो लोकांना रोजगारही दिला आहे. चला, अशाच काही यशस्वी भारतीय कंपन्यांचा प्रवास जाणून घेऊया ज्यांनी अगदी लहान सुरुवात करून आज व्यवसाय क्षेत्रात आपले साम्राज्य उभे केले आहे.
२०१२ मध्ये फाल्गुनी नायर यांनी केवळ एका ऑनलाइन ब्युटी स्टोअरमधून ‘नायका’ची सुरुवात केली. पूर्वी इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये कारकीर्द घडवलेली फाल्गुनी यांनी आपली नोकरी सोडून या स्टार्टअपची उभारणी केली. गुणवत्तापूर्ण उत्पादनं, महिलांच्या सौंदर्य गरजा लक्षात घेणारी व्यावसायिक नीती आणि डिजिटल मार्केटिंगचा उत्कृष्ट वापर यामुळे अल्पावधीतच नायका एक युनिकॉर्न कंपनी बनली. आज ही कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध आहे आणि अब्जावधी रुपयांचा व्यवहार करते.
भारताचे सर्वात लोकप्रिय बिस्किट ब्रँड म्हणजे पार्ले जी. याची स्थापना मोहनलाल दयाल यांनी विलेपार्ले येथील एका जुन्या बंद कारखान्यात केली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत कुटुंबातील १२ सदस्य होते. रेशीम व्यापारात असलेल्या मोहनलाल यांनी बिस्किटाच्या व्यवसायात पाऊल टाकले आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान पार्लेची लोकप्रियता झपाट्याने वाढली. आज पार्ले जी सुपरमार्केटपासून गल्लीतील दुकानापर्यंत सहज उपलब्ध असणारे भारतातील अव्वल बिस्किट ब्रँड बनले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेचे डूम्सडे प्लेन रशियाच्या डूम्सडे रेडिओपेक्षा किती वेगळे? जाणून घ्या त्यांना का म्हणतात ‘विनाशाचे चिन्ह’
अमूल ही केवळ डेअरी कंपनी नसून शेतकऱ्यांच्या एकतेची आणि स्वावलंबनाची कहाणी आहे. गुजरातमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या दूध उत्पादनाची योग्य किंमत मिळत नव्हती. त्यामुळे त्यांनी सहकार पद्धतीने एकत्र येऊन अमूलची स्थापना केली. कालांतराने अमूलने देशभरात आपली घसघशीत बाजारपेठ निर्माण केली आणि आज अमूल हा भारताचा टॉप डेअरी ब्रँड बनला आहे. दूध, लोणी, चीज, दही अशा असंख्य उत्पादने देणारा अमूल जागतिक स्तरावरही ओळखला जातो.
१९८९ साली सुरू झालेली गती लॉजिस्टिक्स कंपनी ही भारतातील अग्रगण्य लॉजिस्टिक्स आणि ट्रान्सपोर्टेशन सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. सुरुवातीला फक्त एका ट्रकपासून सुरू झालेली ही कंपनी आज देशभरात हजारो वाहने, गोदामं आणि कर्मचारी यांचा व्यापक नेटवर्क उभारून उभी राहिली आहे. गतीने वेळेवर सेवा, विश्वासार्हता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे आपली खास ओळख निर्माण केली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran-Israel War : ‘आम्ही सर्वांचा हिशेब करू…’ इराणने इस्रायलच्या रुग्णालयावर हल्ला केल्यानंतर नेतान्याहू कडाडले
या सर्व कंपन्यांची यशोगाथा ही केवळ व्यवसायिक दृष्टिकोनातून नव्हे, तर संघर्ष, दूरदृष्टी आणि सामाजिक बदलाची प्रेरणा देणारी आहे. लहान सुरुवातीला घाबरून न जाता, त्या संधी म्हणून स्वीकारल्यास कोणतीही कल्पना यशस्वी होऊ शकते, हे या कंपन्यांनी सिद्ध केले आहे. या यशस्वी उदाहरणांमधून आजच्या नवउद्योजकांना आणि स्टार्टअप संस्कृतीला निश्चितच प्रेरणा मिळते.