वर्षातील पहिला महिना म्हणजे जानेवारीमध्ये सोन्याच्या (Gold Price Today) किमतीमध्ये वारंवार वाढ होत आहे. आज पुन्हा एकदा सोनं नव्या उच्चांकावर आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार 24 जानेवारीला सराफा बाजारात सोने 312 रुपयांनी महागलं असून 57 हजार 362 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलं आहे. याआधी सोन्याचे दर 20 जानेवारीला मोठ्या प्रमाणावर वाढले होते. तेव्हा सोन्याची किंमत 57 हजार 50 रुपये झाली होती.(Gold Rate Today)
जानेवारीत 2400 रुपयांनी वाढला सोन्याचा दर
जानेवारी महिन्यात आत्तापर्यंत 2,427 रुपयांनी सोन्याची किंमत वाढली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला हा दर 54 हजार 935 रुपये इतका होता. आता तो 57 हजार 362 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. वर्षाच्या शेवटापर्यंत हा दर 64 हजारची मजल गाठू शकतो.
चांदीचा दर झाला कमी
चांदीविषयी सांगायचं तर चांदीचा भाव आज कमी झाला आहे. सराफा बाजारात 267 रुपयांनी भाव कमी होऊन 68 हजार 6 रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे. काल 23 जानेवारीला 68 हजार 273 इतका भाव होता.
2023 मध्ये 64,000 रुपयांपर्यंत वाढणार सोन्याचा भाव
आर्थिक अस्थिरतेच्या कालावधीत RBI सारख्या जगातील अनेक केंद्रीय बँकांनी सोन्याची साठवणूक वाढवली आहे. केडिया ग्रुपचे डायरेक्टर अजय केडिया यांच्या मते केंद्रीय बँकांकडून सोन्याची खरेदी होणं हा सकारात्मक संकेत आहे. यामुळे सोन्याच्या किमतीला सपोर्ट मिळेल. अजय केडिया म्हणाले की 2023 या वर्षाच्या शेवटी सोने 64,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतं.
सोन्याच्या खरेदीत देशाचा दुसरा नंबर
सोने खरेदीत चीनचा पहिला नंबर आहे. चीन दरवर्षी 673 टन सोने खरेदी करणारा देश आहे. तर दुसऱ्या नंबरवर असलेला भारत 611 टन इतकी सोने खरेदी करणारा देश आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या रिपोर्टमधील हे आकडे आहेत. या रिपोर्टनुसार भारतात सोन्याच्या विक्रीमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 60% प्रमाण हे बांगड्या आणि चेन यांचे आहे. या यादीत नेकलेस भलेही 15-20% ची भागीदारी असलेला प्रकार असला तर वजनाच्या बाबतीत नेकलेस वजनदार असतात. बांगड्या आणि चेनचं वजन बहुतेक वेळा 10 ते 15 ग्रॅम असतं, त्याचवेळी बहुतांश नेकलेस 30 ते 60 ग्रॅमचे असतात. सरासरी 3 ते 7 ग्रॅमपर्यंत सोन्यात बनणारे कानातले आणि अंगठ्या यांचा एकूण सोने विक्रीतला हिस्सा 10-20% आहे.